औंढ्यात एका २८ वर्षीय युवकाला कोरोनाची लागण
औंढ्यात एका २८ वर्षीय युवकाला कोरोनाची लागण
रुग्ण संख्या पोहचली ११वर
हिंगोली - मुंबई येथून (ता.१८) औंढा तालुक्यात परतलेल्या एका २८ वर्षीय पुरुषाला कोरोनाची बाधा झाल्याचा अहवाल गुरुवारी प्राप्त झाला असून त्याला औंढा येथीलकोरोना सेंटर मध्ये भरती करण्यात आले असून त्याची प्रकृती स्थिर आहे. कुठल्याही प्रकारची गंभीर लक्षणे नसल्याचे अहवालावरून दिसून आले आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत १०१ रुग्णांना कोरोनाची लागण झाली असून त्यापैकी ९० रुग्ण बरे झाल्याने त्यांना सुट्टी देण्यात आली आहे. सद्य स्थितीला जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या ११ वर पोहचली आहे. दरम्यान औरंगाबाद येथे भरती केलेल्या सात पैकी सहा जवानांचा कोरोना पॉझिटिव्ह अहवाल निगेटिव्ह आल्याने त्यां जवानांना सुट्टी देण्यात आली आहे. आता जिल्ह्यात११ कोरोना बाधितांची संख्या११ वर पोहचली आहे.