धक्कादायक ; हिंगोलीत एकाच दिवशी ५० रुग्ण 







 

धक्कादायक ; हिंगोलीत एकाच दिवशी ५० रुग्ण 

 रुग्ण संख्या पोहचली ६२ वर 

 

हिंगोली -   मुंबई येथून औंढा तालुक्यात आलेल्या एका व्यक्तीसह वसमत तालुक्यातील व्यक्तींना कोरोनाची लागण झाल्याचे शनिवारी सकाळी स्पष्ट झाले आहे . तर रात्री उशिरा आलेल्या अहवालात मुंबई, दिल्ली येथून परतलेल्या सेनगाव तालुक्यातील १३ व कोरोना  सेंटर लिंबाळा गेथील  ३१ जणांना कोरोनाची लागण झाली आहे . त्यामुळे जिल्ह्यात शनिवारी  एकाच दिवशी तब्बल ५० नवे रुग्ण आढळले आहेत . या मध्ये एका समुदाय आरोग्य अधिकाऱ्याचाही समावेश आहे .

 

शनिवारी सकाळी आलेल्या अहवालात मुंबईवरून हिंगोलीत परतलेल्या ६ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे . त्यात पुन्हा कळमनुरी तालुक्यातील कामठा येथील एका ५३ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाल्याने आरोग्य विभागाची झोप उडाली  आहे.सेनगाव तालुक्यातील तब्बल १३ जण कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत . या मध्ये मुंबई वरून परतलेले खुडज येथील ९ , दिल्ली येथून बरडा येथे आलेले ३ तर गोरेगाव येथे क्वारंटाईन असलेले सुरजखेडा येथील एका रुग्णाचा समावेश आहे . तर कोरोना केअर सेंटर लिंबाळा येथील ३१ व्यक्तींना कोरोनाची लागण झाली आहे . या मध्ये मुंबईवरून परतलेले २२ , औरंगाबाद ४ , रायगड १ , कर्नाटक राज्यातील बिदर येथून आलेला एक , भिरडा येथील कोरोना बाधित रुग्णाच्या संपर्कातील २ व्यक्ती तर एका समुदाय आरोग्य अधिकारी यांचा समावेश आहे . 

 

जिल्ह्यात शनिवारी तब्बल ५० कोरोना बाधित रुग्ण आढळले आहेत.आता जिल्ह्यात एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या १५१ एवढी झाली आहे . त्यातील ८ ९ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना सुट्टी देण्यात आली आहे . आहे तर सद्या जिल्ह्यात एकूण कोरोना बाधित रुग्णाची संख्या ६२ वर पोहचली आहे .त्यामुळे आता आरोग्य विभागाची धाकधूक वाढली आहे.


 

 



 



 













 

ReplyForward







Popular posts from this blog

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कृषी अधिकाऱ्याच्या दालनात आंदोलन

काकडदाभा येथे अनेकांचा आमदार बांगर यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश

ओमप्रकाश देवडा बँकेला ३.१५ कोटीचा निव्वळ नफा