हिंगोली रुग्ण संख्या पोहचली 89 वर , शतकाकडे वाटचाल
खळबळ ; हिंगोलीत पुन्हा नव्याने १४ एसआरपीएफ जवान कोरोना पॉझिटिव्ह
रुग्ण संख्या पोहचली 89 वर ,शतकाकडे वाटचाल
हिंगोली - मालेगाव व मुंबई येथून बंदोबस्तवरून परतलेल्या पुन्हा नव्याने १४ जवानांना कोरोना पॉझिटिव्ह असल्याचा अहवाल मंगळवारी सकाळी बाराच्या सुमारास प्राप्त झाला असल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.यामुळे एकूण ८२ व जालना येथील एक जवान अश्या एकूण ८३ जवानांना कोरोनाचीलागण झाली आहे .आतापर्यन्त सुमारे ८९ रुग्ण पॉझिटिव्ह असल्याचे प्राप्त आकडेवारीवरून स्पस्ट झाले आहे.त्यामुळे जिल्ह्याची कोरोना बाधितांची संख्या शतकाकडे वाटचाल करीत आहे.
सोमवारी रात्री बाराच्या सुमारास प्राप्त अहवाला नुसार २३ जवान व सामान्य रुग्णालयातील एका परीचारिकेला असे मिळून सुमारे २४ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले असतानाच पुन्हा मंगळवारी त्यात १४ जवानांची भर पडल्याने कोरोना पॉझिटिव्ह मध्ये वाढ होऊन आता ती ८९ एवढी झाली आहे.
मुंबई ,जालना येथून कर्तव्य बजावून परतलेल्या १९४ जवान हिंगोलीत दाखल झाल्यानंतर त्यांना १४ दिवस राज्य राखीव दलाच्या एका हॉल मध्ये क्वारंटाइन करण्यात आले होते. त्यानंतर या सर्वांचे स्वाब नमुने औरंगाबाद येथील प्रयोग शाळेकडे पाठविण्यात आले होते. त्यांचा अहवाल सामान्य रुग्णालयात प्राप्त होताच यातील पहिल्या टप्यात ४८ जवानांना कोरोना लागण झाल्याचे स्पस्ट झाले असताना ,त्यांना स्वतंत्र कक्षात भरती करण्या ऐवजी कोरोना पॉझिटिव्ह झालेल्या आणि न झालेल्या जवानांना एकत्र ठेवल्याची चूक भोवल्याने आजघडीला जवानांच्या रुग्ण संख्येत भर पडत आहे.
बंदोबस्तासाठी गेलेल्या ८३ जवानापैकी ३५ जवान हे मालेगाव येथे गेलेले होते. तर उर्वरित ४८ जवान हे मुंबई येथे कार्यरत होते.तसेच जिल्हा सामान्य रुग्णालयात कार्यरत असलेल्या एका २४ वर्षीय परीचारिकेला देखील कोविड -१९ ची लागण झाल्याचे सोमवारी रात्री प्राप्त अहवालावरून स्पस्ट झाले आहे. त्यामुळे आजमितीला जिल्ह्यात सुमारे ९० रुग्ण पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले आहे. या पूर्वी सर्वात प्रथम पॉझिटिव्ह असलेला एक रुग्ण निगेटिव्ह होऊन बरा झाल्याने त्याला सुट्टी दिली आहे. त्यामुळे आता ८९ कोरोना लागण झालेल्या रुग्णावर उपचार सुरु आहेत. त्यामुळे दिवसेंदिवस रुग्ण संख्या वाढत असल्याने जिल्हा प्रशासनाची धाकधूक वाढली आहे. नागरिकांनी अत्यावश्यक काम असेल तरच घराबाहेर पडा ,अन्यथा पडु नये ,घरीच थांबा, सुरक्षित राहा असे आवाहन देखील जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. किशोर प्रसाद श्रीवास यांनी केले आहे.