उदगीर मध्ये तीन दिवसांमध्ये रेडझोन भागात अधिक कडक बंदोबस्त

उदगीर (संगम पटवारी) :


शहरात कोरोनाच्या संसर्गजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी रविवारी (ता.१०) पर्याय संचारबंदीचे आदेश लागू केले होते. सोमवारपासून (ता.११) एक आठवडा अत्यावश्यक सेवेसह कृषीसेवा केंद्र सुरु करण्यासाठी आता परवानगी देण्यात आल्याची माहिती उपजिल्हाधिकारी प्रवीण मेंगशेट्टी यांनी दिली.


शहरात दिवसेंदिवस कोरोनाचा संसर्ग वाढत असल्यामुळे व रेड झोनमधील नागरिक बाजारपेठेत दाखल होत असल्याने कोरोनाचा संसर्गाचा धोका वाढला होता. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी शुक्रवारपासून (ता.८) तीन दिवस संचारबंदी लागू केली होती. उदगीर शहरासह शहराअंतर्गत असलेल्या ग्रामीण भागातील वस्तीमध्ये संचार  बंदीचे आदेश निर्गमित केले होते. या तीन दिवसांमध्ये रेडझोन भागात अधिक कडक बंदोबस्त लावून जाण्याचे मार्ग काटेरी कुंपणाने सील करण्यात आले आहे. कोरोनाचा प्रभाव थोडासा कमी झाल्याने पुन्हा सोमवारपासून (ता.११) कृषीसेवा केंद्रासह अत्यावश्यक सेवेला सकाळी सात ते बारापर्यंत दुकाने उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे

या आदेशानुसार या संचारबंदीच्या काळात फक्त शासकीय कार्यालय, त्यांचे कर्मचारी, त्यांची वाहने, सर्व शासकीय वाहने, सर्व शासकीय खाजगी दवाखाने, सर्व औषधे दुकाने, शासकीय निवारा ग्रह, घरपोच गॅस सेवा, घरपोच पिण्याचे पाणी पुरवणे, दूध वितरण, वैद्यकीय आपत्कालीन सेवा, अत्यावश्यक सेवेसाठी विशेष पास असणारी वाहने अथवा व्यक्ती, किराणा दुकाने, कृषीसेवा देणारी दुकाने, टपाल कार्यालय, बँका यांना आठ ते बारा वाजेपर्यंत तर इलेक्ट्रॉनिक्स आणि इलेक्ट्रिकल्सच्या फक्त घरपोच सेवेला मुभा देण्यात आली आहे.

शहरातील अत्यावश्यक सेवांच्या व्यवस्थेबाबत नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांनी तर शहरालगत असलेल्या सोमनाथपूर, निडेबन, मदलापुर, मलकापूर या ग्रामीण भागातील शहरात समाविष्ट भागाबाबत गटविकास अधिकारी व ग्रामसेवक यांनी यावर नियंत्रण करण्याचे आदेशित करण्यात आले आहे. या जमावबंदीच्या काळात उदगीर शहरात पाचपेक्षा जास्त व्यक्ती एकत्र जमणे व वाहतूक करणे यावर बंदी घालण्यात आली आहे. शिवाय नागरिकांनी गर्दी करू नये, मास्क न घालता फिरू नये, कसल्याही प्रकारच्या अफवा करू नये व आपल्याला बळी पडू नये, गरज असेल तरच घराबाहेर पडावे असे आवाहन यावेळी उपजिल्हाधिकारी श्री मेंगशेट्टी यानी केले आहे.


Popular posts from this blog

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कृषी अधिकाऱ्याच्या दालनात आंदोलन

काकडदाभा येथे अनेकांचा आमदार बांगर यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश

ओमप्रकाश देवडा बँकेला ३.१५ कोटीचा निव्वळ नफा