.परभणी : जिल्ह्यातील रुग्णसंख्या 67 वर
कोरोनाचा उद्रेक ः आणखी 31 बाधित
जिल्ह्यातील रुग्णसंख्या 67 वर
परभणी, दि.26(प्रतिनिधी)-
जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत मंगळवारी(दि.26) रात्री साडेआठ वाजता नांदेड येथील प्रयोगशाळेतून प्राप्त अहवालानुसार आणखीन 31 कोरोनाबाधित रुग्णांची भर पडल्याची खळबळजनक माहिती हाती आली आहे. यात पूर्णेतील 10, सेलूतील 2, गंगाखेडातील 4, पालम 1, जिंतूर 2, परभणी 12 असे एकूण 31 रुग्ण असल्याची प्राथमिक माहिती आहे. दरम्यान, यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 67 पर्यंत पोहचली आहे.
जिंतूर तालुक्यातील सावंगी(भांबळे) येथील कोरोनाबाधित महिलेचा मृत्यू झाल्याच्या पार्श्वभूमीवर या जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिकांसह शासकीय यंत्रणेत सुध्दा प्रचंड अस्वस्थता पसरली आहे. विशेषतः दिवस्दिवस संशयितांसह कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येतील तसेच बाधित व्यक्तींच्या संपर्कातील क्वारंटाईन केलेल्या व्यक्तींच्याही वाढीने प्रशासनात चिंतेचे वातावरण पसरले आहे.
मंगळवारी सायंकाळी पाच वाजेपर्यंत 265 संशयितांचे स्वॅब नांदेड येथील प्रयोगशाळेत प्रलंबीत होते. त्यापैकी 34 अनिर्णायक आहेत. रविवारी रात्रीपर्यंत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या एकूण 36 पर्यंत असतांना सोमवारी राञी पर्यंत एकही अहवाल प्राप्त झाला नाही. परंतू मंगळवारी रात्री उशिरा साडेआठच्या सुमारास अहवाल प्राप्त झाला.
सद्दस्थितीत जिल्ह्यातही प्रचंड अस्वस्थता पसरली आहे. विशेषतः कोरोनाबाधित सर्व रुग्ण हे परजिल्ह्यातून आपल्या मुळगावी म्हणजे परभणी जिल्ह्यात दाखल झालेले आहेत. त्यामुळेच परजिल्ह्यातील व्यक्तींसह कुुटुंबियांच्या अधिकृतपणे-अनाधिकृतपणे प्रवेशामुळे या जिल्ह्यात शहरी व ग्रामीण भागात कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव सर्वदूरपर्यंत पसरला आहे. वातावरण चिंतेचे झाले आहे.