कोटयाहून सारे मुले दाखल जिल्हा प्रशासनाद्वारे मुलांसाठी खास बसेस उपलब्ध
कोटयाहून सारे मुले दाखल
जिल्हा प्रशासनाद्वारे मुलांसाठी खास बसेस उपलब्ध
परभणी, गावंडे
प्रतिनिधी
लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर कोटा(राजस्थान) या शहरात शिक्षणाच्या निमित्ताने अडकून पडलेल्या शहरासह जिल्ह्यातील 34 विद्यार्थ्यांना जिल्हा प्रशासनाने खास बसेस तैनात करीत माघारी आणले.
गेल्या सव्वा महिन्यापासून हे विद्यार्थीं कोटयात अडकून पडले होते. त्यामुळे त्यांचे पालक कमालीचे चिंतेत होते. या मुलांना आणण्याकरिता परवानगी द्यावी, असा अशी मागणी पालक वर्गातून होत होती. विशेषतः उत्तरप्रदेश व अन्य राज्यांनी आपआपल्या राज्यातील मुलांना खास बसेसद्वारे माघारी आणल्यानंतर पालकवर्गातून मोठा दबाव निर्माण झाला. त्यावेळीच राज्य सरकारने त्या-त्या जिल्ह्यातील प्रशासनाने या मुलांना आणण्या संदर्भात पाऊले उचलावीत, अशा सूचना दिल्या होत्या. त्याप्रमाणे जिल्हाधिकारी दिपक मुगळीकर यांनी अन्य अधिका-यांच्या मदतीने जिल्ह्यातील मुलांना आणण्याकरिता राज्य परिवहन महामंडळाच्या दोन बसेस पाठविल्या. त्या बसेस शुक्रवारी रात्री औरंगाबाद मार्गे परभणीत दाखल झाल्या. बसेसमधील मुलांना लगेचच एमआयडीसीतील एका हॉटेलमध्ये तात्पुरत्या निवासाची व्यवस्था करण्यात आली. तेथून या मुलांची शनिवारी जिल्हा शासकीय रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करण्यात आली. या मुलांना होम क्वारंटाईन म्हणून ठेवले जाईल, अशी शक्यता आहे.