स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कृषी अधिकाऱ्याच्या दालनात आंदोलन
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कृषी अधिकाऱ्याच्या दालनात आंदोलन हिंगोली - जिल्ह्यातील वंचित शेतकऱ्यांना पीक विमा सरसकट देण्यात यावा यासाठी गुरुवारी (ता.७) जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयात शेतकऱ्यांनी जाऊन घेराव घालून गोंधळ घालत ठिय्या आंदोलन केले. जिल्ह्यात मागील वर्षात खरीप हंगामात जोरदार अतिवृष्टी झाल्याने शेती पिकांचे मोठे नुकसान झाले होते.यासाठी विविध पक्षाच्या नेत्यांनी पीक पाहणी केली होती. त्यानंतर पीक पाहणी प्रयोग विमा कंपन्यांकडून करण्यात आला होता. तर शेतकऱ्यांचे जास्तीचे नुकसान होऊ नये म्हणून पीक विमा कंपनींनीने शेतकऱ्यांना विम्याचा परतावा दिला नाही. तीन वर्षापासून कृषी विभागाकडून व कंपन्यांकडून थट्टा केली जात असल्याचा आरोप संतप्त शेतकऱ्यांनी केला. यापूर्वी स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून (ता.३०) डिसेंबर रोजी कृषी कार्यालयाकडे दिलेल्या निवेदनात सात जानेवारी रोजी आंदोलन छेडण्याचा इशारा दिला होता. पीक विम्याचा परतावा मिळत नसल्याने व कृषी विभागाकडून काही प्रयत्न होत नसल्याने अखेर संतप्त शेतकऱ्यांनी गुरुवारी कृषी अधीक्षक कार्यालय गाठून अधिकाऱ्यांना जाब विचारला, त्यावेळी म...