लातूर 2, उदगीर 3, तर जळकोट 1, बीड 7, उस्मानाबाद 3 व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह


लातूर 2, उदगीर 3 तर जळकोट 1, बीड 7, उस्मानाबाद 3 व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह


 


Latur district
total 55
active cases 25
discharge 29
death 2


  विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेत आज एकुण 78 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी आले होते. त्यापैकी विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेतील 11 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी आले असून त्यापैकी 2 व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आले असून ते दोघेही मुंबई येथून प्रवास करून आलेले व्यक्ती आहेत व 09 व्यक्तींचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत.  उपजिल्हा रुग्णालय, उदगीर येथुन एकुण 9 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी आले होते  त्यापैकी 6 व्यक्तींचे अहवाल निगेटीव्ह आले असुन 3 व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.   जळकोट येथील एका व्यक्तींचे स्वॅब तपाणीसाठी आला होता त्या व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. बीड येथील 29 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी आले होते त्या 22 व्यक्तींचे अहवाल निगेटीव्ह आले असून 7 व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत व उस्मानाबाद येथील 28 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी आले होते त्यापैकी 25 व्यक्तींचे अहवाल निगेटीव्ह आले असुन 3 व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत असे एकुण 78 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी आले होते त्यापैकी 62 व्यक्तींचे अहवाल निगेटीव्ह आले असुन 16 व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत अशी माहिती विषाणु संशोधन व निदान प्रयोगशाळेचे प्रमुख तथा सहयोगी प्राध्यापक सुक्ष्मजीवशास्त्र विभाग डॉ. विजय चिंचोलकर व विलासराव देशमुख शासकीय विज्ञान संस्थेचे अधिष्ठाता, डॉ. गिरीष ठाकुर यांनी दिली. 


Popular posts from this blog

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कृषी अधिकाऱ्याच्या दालनात आंदोलन

काकडदाभा येथे अनेकांचा आमदार बांगर यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश

ओमप्रकाश देवडा बँकेला ३.१५ कोटीचा निव्वळ नफा