उदगीरच्या 2 व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह एकूण 10 +ve झाले 

उदगीरच्या 2 व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह एकूण 10 +ve झाले



विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेत आज दिनांक 03.05.2020 रोजी एकूण 13 व्यक्तींचे  स्वॅब (कोविड 19)  तपासणी साठी आले होते. त्यापैकी 12 व्यक्तीचे स्वॅब उदगीर येथून आले होते. त्यापैकी 04 व्यक्तीचे अहवाल (Inconclusive) आले असल्यामुळे त्यांच्या स्वॅबची 48तासानंतर पुनर्तपसणी करण्यात आली त्यापैकी 2 व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह, एका व्यक्तीचा अहवाल निगेटिव्ह व 01 व्यक्तीचा अहवाल पुन्हा (Inconclusive) आला असल्यामुळे त्यांची पुन्हा 48 तासानंतर स्वॅब घेऊन पुनर्तपासणी करण्यात येणार आहे व उर्वरीत नव्याने आलेल्या 8 व्यक्तीचे अहवाल हे निगेटिव्ह आले आहेत. 
विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेतील एका व्यक्तीच्या अहवाल निगेटिव्ह आलेला आहे. सद्यस्थितीत एकही अहवाल प्रलंबित नाही अशी माहिती विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेचे अधिष्ठाता डॉक्टर गिरीष ठाकूर यांनी दिली.



 
                                           अधिष्ठाता,
                       विलासराव देशमुख शासकीय 
                        वैद्यकीय  विज्ञान संस्था, लातुर


Popular posts from this blog

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कृषी अधिकाऱ्याच्या दालनात आंदोलन

काकडदाभा येथे अनेकांचा आमदार बांगर यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश

ओमप्रकाश देवडा बँकेला ३.१५ कोटीचा निव्वळ नफा