कोरोनाच्या धास्तीने बियर, विदेशी दारू दुकानाला नकार
कोरोनाच्या धास्तीने बियर, विदेशी दारू दुकानाला नकार
जिल्हाधिकारी जयवंशी यांनी काढले आदेश
हिंगोली - जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णाची संख्या ५२ वर गेल्याने प्रशासनाची डोकेदुखी वाढली. कोरोना संसर्ग टाळण्यासाठी जिल्हाधिकारी जयवंशी यांनी देशी, विदेशी, बियर शॉपी सुरु करण्यासाठी बंदी असल्याचे आदेश सोमवारी काढले आहेत. त्यामुळे तळी रामांची मात्र चांगलीच गैरसोय होत आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेली चाळीस दिवसापासून जिल्ह्यात लॉकडाऊन ,संचारबंदी कायदा लागू आहे. मात्र अत्यावश्यक सेवा वगळता इतर व्यवसाय पूर्णपणे बंद आहेत. आतापर्यन्त दोन लॉक डाऊन झाले. पहिला२१ तर दुसरा १९दिवसाचा होता. आता तिसऱ्या टप्याला सोमवार पासून सुरु झाली आहे.जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या वाढल्याने मागील पाच दिवस सर्व व्यवहार आस्थापना पूर्ण बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी जयवंशी यांनी दिले होते. त्यानुसार सोमवार पासून अत्यावश्यक सेवा सुरु करण्यात आली.
केंद्र शासनाने ,राज्य शासनाने तीन मे पासून रेड झोन वगळता ऑरेंज व ग्रीन झोन मधील बियर शॉपी, देशी, विदेशी दारू विक्री व्यवसायाला परवानगी दिली असून जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी यांनी सिचवेशन पाहून निर्णय घेण्याचे काळविले होते. मात्र
जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे. तो रोखण्यासाठी काही काळ पुढील आदेश येई पर्यंत दारू दुकाने बंद ठेवण्यात येणार आहेत. जर का, कोणी दुकाने उघडल्यास त्या दुकानावर कारवाई करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.
जिल्ह्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन ,संचारबंदी लागू असताना होलसेल व रिटेल बियर शॉपी, देशी, विदेशी मद्य विक्री दुकाने, धाबे आदी ठिकाणी शील केले तरी दारूचा महापूर कसा वाहत आहे. हा प्रश्न पडला आहे. लॉकडाऊनचा फायदा उचलत ब्लॅक मध्ये देशी दारू दोनशे ते अडीचशे रुपयांना विकली जात आहे. म्याकडोल नंबर १६० रुपयांची बॉटल आज ब्लॅक मध्ये सहाशे रुपयांना विकली जात आहे. तर ब्लेंडर सहाशे ते सातशे या प्रमाणे भाव वाढविले जात असून यात तळीरामाचे खूप नुकसान होत असून शासनाचा महसूल ही बुडत आहे.या लॉक डाऊनच्या काळात महागडी दारू पिऊन लोकांचे संसार उध्वस्त होत आहेत. याकडे देखील जिल्हाधिकारी जयवंशी यांनी विचार करून दारू व्यवसायिकांना सोशल डिस्टन्सच्या नियमाच्या आधारावर व कॉन्टेन्टमेन्ट झोन वगळून परवानगी दयावी असे वाटते.