प्रोफेसर पाटील यांचे विद्यार्थ्यांना झूम एप द्वारे ऑनलाईन धडे
प्रोफेसर पाटील यांचे विद्यार्थ्यांना झूम एप द्वारे ऑनलाईन धडे
सेनगाव - येथील तोष्णीवाल महाविद्यालयात कार्यरत असलेले अर्थशास्त्र विभाग प्रमुख प्रोफेसर पी. बी. पाटील यांनी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक येथे बीए तृतीय वर्षात प्रवेशित असलेल्या विद्यार्थ्यांना गुरुवारी (ता.३०) झूम अॅपच्या मदतीने ऑनलाइन मार्गदर्शन केले.
भारताच्या आर्थिक विकासात शेतीचे स्थान या विषयावर प्रकाशझोत टाकला . शेतीची वैशिष्टे व महत्त्व या मुद्द्यावर विस्तृत चर्चा केली. शेतीतून कमी उत्पन्न होणे, तसेच उपाययोजना यावर त्यांनी विस्तृत असे भाष्य करून चर्चा केली, इतर विकसित देशांच्या तुलनेत भारतात शेतीतून कमी उत्पन्न होण्यामागील कारणे व त्यावरील उपाययोजनांचा आढावा घेतला. जगभर कोरोना या महामारीमुळे
लॉकडाउन सुरु असल्याने महाविद्यालये बंद आहेत. विद्यार्थ्यांना लॉकडाऊन काळातही विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर परिणाम होऊ नये शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी विद्यार्थ्यांना ज्ञानार्जन करता यावे यासाठी सदरील उपक्रम महाविद्यालयातर्फे आयोजित केला आहे .सदरील ऑनलाइन संवाद यशस्वी करण्यासाठी प्राचार्य तळणीकर , विठ्ठल वलेकर भगवान खनपट्टे प्रा संदीप मरकड प्रा. गोविंद भालेराव आदींनी परिश्रम घेतले.