उदगीरच्या एका व्यक्तीचा अहवाल पॉझिटीव्ह , एकूण 14 +Ve

उदगीरच्या एका व्यक्तीचा अहवाल पॉझिटीव्ह आला, एकूण 14 +Ve


संगम पटवारी :-


लातुर येथील विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेत दिनांक 05.05.2020 रोजी सकाळी 8.00 ते दु 4.00 पर्यंत कोरोना (कोविड-19) बाहयरुग्ण विभागात एकुण 65 व्यक्तींची तपासणी करण्यात आली. आजपर्यंत एकुण 230 व्यक्तींच्या स्वॅबची तपासणी करण्यात आली होती.  त्यापैकी 222 व्यक्तींचे अहवाल निगेटीव्ह आलेले असुन यापूर्वीच दिनांक 04.04.2020 रोजी 8 व्यक्तींचे अहवाल पॉझिटीव्ह आलेले होते ते रुग्ण बरे झाल्यामुळे त्यांना या रुग्णालयातुन डिस्चार्ज देण्यात आला आहे.  आजपर्यंत 200 व्यक्तींचा Home Quarantine  कालावधी समाप्त झाला असुन एकुण 20 व्यक्तींना जिल्हा आरोग्य विभागामार्फत Home Quarantine मध्ये निगराणीखाली ठेवण्यात आले आहे. तसेच 10 व्यक्तींना Institutional Quarantine मध्ये ठेवण्यात आले आहे अशी माहिती कोरोना विलगीकरण कक्ष प्रमुख तथा सहयोगी प्राध्यापक औषधवैद्यकशास्त्र विभाग डॉ. मारुती कराळे यांनी दिली.



 विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेत आज एकुण 17 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी आले होते. त्यापैकी उपजिल्हा रुग्णालय, उदगीर येथुन एकुण 8 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी आले  होते त्यापैकी एका व्यक्तीचा अहवाल पॉझिटीव्ह आला आहे व एका व्यक्तींचा अहवाल (Inconclusive) आला असल्यामुळे त्याची 48 तासानंर पुनर्तपासणी करण्यात येणार आहे व उर्वरीत ६ व्यक्तींचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत.  


बीड येथील ९ व्यक्तींचे अहवाल तपासणीसाठी प्राप्त झाले होते त्यापैकी सर्वच ९ व्यक्तींचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत अशी माहिती विषाणु संशोधन व निदोन प्रयोगशाळेचे प्रमुख तथा सहयोगी प्राध्यापक सुक्ष्मजीवशास्त्र विभाग डॉ. विजय चिंचोलकर यांनी दिली. 
 मा. जिल्हाधिकारी, लातुर यांनी जिल्हयात येणा़-या व जिल्हयाबाहेर जाणा़-या व्यक्तींसाठी नियमावली आदेशित केल्यानुसार त्या व्यक्तींची थर्मल स्कॅनींग व इतर आजार (खोकला, सर्दी, श्वास घेण्यास त्रास) तपासणी करुन बाहेर जिल्हयात जाण्यासाठी विहीत नमुन्यातील वैद्यकीय प्रमाणपत्र देण्यात येत आहे. सदरील प्रमाणपत्र हे सर्व शासकीय आरोग्य संस्था, प्राथमिक आरोग्य केंद्रे, ग्रामीण रुग्णालये, लातुर महानगरपालिका अंतर्गत येणा-या सर्व आरोग्य संस्था व लातुर जिल्हयातील सर्व नोंदणीकृत खाजगी वैद्यकीय व्यावसायिक यांच्यामार्फत देण्यात येत आहे. त्यामुळे  आपल्या जवळील शासकीय आरोग्य संस्था, रुग्णालय किंवा नोंदणीकृत खाजगी वैद्यकीय व्यावसायीक यांच्याकडून वैद्यकीय प्रमाणपत्र घ्यावे असे आवाहान विलासराव देशमुख वैद्यकीय संस्थेचे अधिष्ठाता, डॉ. गिरीष ठाकुर  व वैद्यकीय अधिक्षक डॉ. संतोषकुमार डोपे यांनी केले आहे.


 


       
                       
     


Popular posts from this blog

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कृषी अधिकाऱ्याच्या दालनात आंदोलन

काकडदाभा येथे अनेकांचा आमदार बांगर यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश

ओमप्रकाश देवडा बँकेला ३.१५ कोटीचा निव्वळ नफा