आज उदगीर येथुन तबल ५१ दिवसानंतर 13 विद्यार्थी व 11 मजूर नागपूरला एस.टी(बस) ने रवाना

आज उदगीर येथुन तबल 51 दिवसानंतर 13 विद्यार्थी 11 मजूर नागपूरला एस.टी(बस) ने रवाना

उदगीर (संगम पटवारी)

 

      संपूर्ण देशात कोरोना महामारी लागण झाली आहे त्याला आळा घालण्यासाठी लॉकडाऊन करण्यात आले त्यामुळे वाहतूक बंद आहे. परगावी व परजिल्हयात विविध कामासाठी असलेले तसेच शिक्षणासाठी विद्यार्थी हे आपल्या गावी परत जाऊ शकत नव्हते. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे प्रशासनाने याची खबदारी घेतली होती. पण आज लॉक डाऊनला ५१ दिवस होत असून  या काळात नागरिकांना राहण्यासाठी व जेवणासाठी वन वन भटकावे लागत होते. यामुळे मजूर, कामगार आपल्या कुटुंबासोबत हजारो कि मी चा प्रवास पायी चालण्यासाठी निघाले. यात विद्यार्थीही आपला पायी रास्ता चालू ठेवला होता. या गंभीर परीस्थितीची दखल घेत सरकारने नागरिकांना आपापल्या गावी पाठवण्याची व्यावस्था सुरू केली. यात कांही जण खाजगी वाहनांने तर कांहीना रेल्वे, एस.टी. बसची मोफत सोय करण्यात आली.

उदगीर येथेही  शिक्षण घेण्यासाठी असलेले कांही  विद्यार्थी व नागरीक  आपल्या गावी जाण्यासाठी शासनाच्या दारी पायपीठ करत होते. यापूर्वी न.प. च्या शासकीय निवारा केंद्रात ३२ विद्यार्थी विविध राज्यातील अडकले होते.परवा त्यांना पण जाण्यासाठी परवानगी दिली. त्याचप्रमाणे नागपूर येथील एकूण 13 विद्यार्थी, 11 मजूर  नागरीक येथे अडकले होते. प्रशासनाच्या वतीने त्यांच्यासाठी परिवहन महामंडळातर्फे एका बसची मोफत सोय करण्यात आली.  

उदगीर ते नागपुर ही मोफत बससेवा देऊन विद्यार्थी व मजुर एकूण 24 जणांचा ग्रुप करून अप्पर जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांच्या मार्गदर्शनाखाली  व न.प.मुख्याधिकारी भरत राठोड उदगीर ना.तह.राजु खरात यांच्या उपस्थितीत  उदगीर बस आगार प्रमुख यशवंत कानतोडे यांनी ए.डब्लु.एस.कोळपकर, ए.टी.एस टागांटुरे, टी.आय.पळनाटे, वाहतुक नियंत्रक बि.एस.पटवारी, विजय हलाळे,वरिष्ट लिपिक चिंचोले आदी उपस्थीत होते .उदगीर हुन १ बस नागपुर कडे रवाना करण्यात आली.

Popular posts from this blog

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कृषी अधिकाऱ्याच्या दालनात आंदोलन

काकडदाभा येथे अनेकांचा आमदार बांगर यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश

ओमप्रकाश देवडा बँकेला ३.१५ कोटीचा निव्वळ नफा