डेंजर.... उदगीरचे 12 रुग्ण पॉझिटिव्ह, लातूर 1 उस्मानाबाद 04, बीड 01
डेंजर.... उदगीरचे 12 रुग्ण पॉझिटिव्ह,
लातूर 1, उस्मानाबाद 04, तर बीड 01 रुग्ण +ve
*लातूर जिल्हा कोरोना अपडेट* 27 मे
*उपचार घेत असलेले रुग्ण- 58
* उपचाराने बरे झालेले रुग्ण - 58
* मृत्यू झालेले रुग्ण - 3
दिनांक 27.05.2020 रोजी लातूर जिल्ह्यातील एकूण 17 व्यक्तींचे अहवाल प्रलंबित होते त्यापैकी 13 व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आले असून चार व्यक्तींचे अहवाल Inconclusive आले आहेत.
त्यापैकी विलासराव देशमुख शासकीय वैदकीय विज्ञान संस्थेतील एका व्यक्तीचा अहवाल प्रलंबित होता त्या व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून तो 13 मे रोजी पुणे येथून प्रवास करून आलेला असून नांदेड रोड, लातूर येथे वास्तव्यास आहे व तो मूळचा भातांगळी येथील रहिवासी आहे. सद्यस्थितीत तो ऑक्सिजन वर असून त्याची प्रकृती स्थिर आहे.
उपजिल्हा रुग्णालय उदगीर येथील 16 व्यक्तीचे अहवाल प्रलंबित होते त्यापैकी 12 व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आले असून 04 व्यक्तीचे अहवाल Inconclusive आले आहेत अशी माहिती विषाणु संशोधन व निदान प्रयोगशाळेचे प्रमुख तथा सहयोगी प्राध्यापक सुक्ष्मजीवशास्त्र विभाग डॉ. विजय चिंचोलकर व विलासराव देशमुख शासकीय वैदकीय विज्ञान संस्थेचे अधिष्ठाता यांनी सांगितले.