आज एकाच दिवसात लातुर शहरात 10 पॉझिटिव्ह अहवाल
मोती नगर लातूर येथील 09 व देसाई नगर यथील 01 एकूण 10 पॉझिटिव्ह अहवाल
विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेतील 12 व्यक्तींचे अहवाल प्रलंबित होते त्यापैकी 10 व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यापैकी 09 व्यक्ती दिनांक 28.05.2020 रोजी मोती नगर लातूर येथे पॉझिटिव्ह अहवाल आलेल्या व्यक्तीच्या कुटुंबातील सदस्य आहेत व 1 व्यक्ती देसाई नगर लातूर येथील असून ती व्यक्ती मुंबई वरून प्रवास करून आलेली आहे त्यांना निमोनिया असून श्वास घेण्यास त्रास होत आहे त्यांना सध्या विलगीकरन कक्षात दाखल करण्यात आले आहे व 02 व्यक्तींचे अहवाल Inconclusive आले आहेत अशी माहिती कोरोना विलगीकरण कक्षाचे प्रमुख डॉ. मारुती कराळे यांनी सांगितले.