पुन्हा लातूर जिल्हा कोरोना ने पन्नासी पार केले....लातुर 10 पॉझिटीव्ह, उस्मानाबाद 3 पॉझिटीव्ह, बीड 2 पॉझिटीव्ह
लातुर 10 पॉझिटीव्ह, उस्मानाबाद 3 पॉझिटीव्ह, बीड 2 पॉझिटीव्ह
* जिल्ह्यातील आजपर्यंत एकूण रुग्ण संख्या-103
* उपचार घेत असलेले एकूण रुग्ण संख्या - 54
* बरे होऊन घरी गेलेल्या व्यक्तींची संख्या - 47
* मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या - 03
* आज रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात
येणाऱ्या रुग्णांची संख्या - 03.
दिनांक 25.05.2020 रोजीचे एकुण 31 अहवाल प्रलंबित होते त्यापैकी विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेतील 8 व्यक्तींचे अहवाल प्रलंबित होते त्यापैकी २ व्यक्तींचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. त्यापैकी एक व्यक्ती लातुर तालुक्यातील मसला येथील असुन दुसरी व्यक्ती दिनांक 23.05.2020 रोजी हुडको कॉलनी येथे आढळुन आलेल्या पॉझिटीव्ह व्यक्तींच्या कुटूंबातील सदस्य आहे. ०३ व्यक्तींचे अहवाल निगेटीव्ह आले असुन २ व्यक्तींचे अहवाल (Inconclusive) आले आहेत व एका व्यक्तींचा स्वॅब परिपुर्ण न आल्यामुळे Reject करण्यात आला आहे.
उदगीर येथील 2 व्यक्तींचे अहवाल पॉझिटीव्ह आले असुन 3 व्यक्तींचे अहवाल (Inconclusive) आले आहेत. निलंगा येथील ६ व्यक्तींचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत.
असे एकुण लातुर जिल्हयातील १९ व्यक्तींचे अहवाल प्रलंबित होते त्यापैकी 10 व्यक्तींचे अहवाल पॉझिटीव्ह आले असुन ०३ व्यक्तींचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत, ५ व्यक्तींचे अहवाल (Inconclusive) आले असुन एका व्यक्तींचा अहवाल Reject करण्यात आला आहे.
उस्मानाबाद येथील 5 व्यक्तींचे अहवाल प्रलंबित होते त्यापैकी 3 व्यक्तींचे अहवाल पॉझिटीव्ह आले असुन ०२ व्यक्तींचे अहवाल (Inconclusive) आले आहेत.
बीड येथील 7 व्यक्तींचे अहवाल प्रलंबित होते त्यापैकी 02 व्यक्तींचे अहवाल पॉझिटीव्ह आले असुन ०५ व्यक्तींचे अहवाल (Inconclusive) आले आहेत अशी माहिती विषाणु संशोधन व निदान प्रयोगशाळेचे प्रमुख तथा सहयोगी प्राध्यापक सुक्ष्मजीवशास्त्र विभाग डॉ. विजय चिंचोलकर यांनी दिली.
ReplyForward |