उदगीर- 1, अहमदपूर-खंडाळी- 1, जळकोट-1, लातूर - बोरगाव -1, ( एकूण लातूर 4 ) बीड - 8, उस्मानाबाद - 6 अहवाल पॉझिटीव्ह
उदगीर- 1, अहमदपूर-खंडाळी- 1, जळकोट-1, लातूर - बोरगाव -1, ( एकूण लातूर 4 ),
बीड - 8, उस्मानाबाद - 6 अहवाल पॉझिटीव्ह
- : Latur district : -
total ------------------ 66
active cases---------- 35
discharge-------------- 29
death -------------------- 02
total ------------------ 66
active cases---------- 35
discharge-------------- 29
death -------------------- 02
विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेत आज दिनांक 19.05.2020 रोजी एकुण 182 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी आले होते. त्यापैकी विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेतील 16 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी आले होते त्यापैकी 13 व्यक्तींचे अहवाल निगेटीव्ह आले असुन 02व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यापैकी एक व्यक्ती अहमदपूर तालुक्यातील खंडाळी येथील आहे व दुसरी व्यक्ती लातूर तालुक्यातील बोरगाव येथील आहे दोघेही 3 दिवसापूर्वी मुंबई येथून प्रवास करून आलेले आहेत व एका व्यक्तीचा अहवाल (Inconclusive) आला आहे.
उपजिल्हा रुग्णालय, उदगीर येथुन एकुण 35 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी आले असुन त्यापैकी एका व्यक्तीचा अहवाल पॉझिटीव्ह व 34 व्यक्तींचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत, चाकुर येथुन 6 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी आले हाते त्यापैकी सर्वच 6 व्यक्तीचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत, जळकोट येथील 10 व्यक्तींचे अहवाल तपासणीसाठी आले असुन त्यापैकी एका व्यक्तीचा अहवाल पॉझिटीव्ह आला असून 8 व्यक्तींचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत व एका व्यक्तीचा स्वॅब परीपूर्ण न आल्यामुळे Reject करण्यात आला आहे.लातुर जिल्हयातील असे एकुण 67 स्वॅब तपासणीसाठी आले होते त्यापैकी 4 पॉझिटीव्ह असुन 61 व्यक्तींचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत व एका व्यक्तीचा अहवाल (Inconclusive) व एका व्यक्तीचा स्वॅब Reject करण्यात आला आहे.
तसेच बीड जिल्हयातील 66 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी आले होते त्यापैकी 55 व्यक्तींचे अहवाल निगेटीव्ह आले असुन 8 व्यक्तींचे अहवाल पॉझिटीव्ह आलेले आहेत व 3 व्यक्तीचे अहवाल Inconclusive आले असल्यामुळे त्यांची उद्या पुनर्तपासणी करण्यात येणार आहे.
उस्मानाबाद जिल्हयातील 49 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी आले होते त्यापैकी 42 व्यक्तींचे अहवाल निगेटीव्ह आले असुन 6.व्यक्तींचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत व एका व्यक्तीचा अहवाल Inconclusive आला आहे.
असे एकुण आज 182 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी आले होते त्यापैकी 18 व्यक्तींचे अहवाल पॉझिटीव्ह आले असुन 158 व्यक्तींचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत 5 व्यक्तीचे अहवाल Inconclusive आले आहेत व एक व्यक्तीचा स्वॅब Reject केला आहे आहेत अशी माहिती विषाणु संशोधन व निदान प्रयोगशाळेचे प्रमुख तथा सहयोगी प्राध्यापक सुक्ष्मजीवशास्त्र विभाग डॉ. विजय चिंचोलकर व विलासराव देशमुख शासकीय वैदकीय विज्ञान संस्थेचे अधिष्ठाता डॉ. गिरीष ठाकूर यांनी दिली.