कळमनुरी - होम क्वॉरंटाईन महिलेला बाहेरगावी जाणे पडले महागात






होम क्वॉरंटाईन महिलेला बाहेरगावी जाणे पडले महागात  

 

आखाडा बाळापूर  येथे गुन्हा दाखल

 

कळमनुरी -  तालुक्यातील कामठा येथे होम क्वारंटाईनचे आदेश डावलून नांदेड येथे जाणाऱ्या महिलेवर आखाडा बाळापुर पोलिस ठाण्यात आपत्ती व्यवस्थापन कायद्याअंतर्गत सोमवारी  गुन्हा दाखल झाला आहे.

 

कळमनुरी तालुक्यातील कामठा  येथील एक महिला नांदेड येथून गावी आल्यानंतर त्या महिलेचा होम क्वॉरंटाईन होण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यानुसार सदर महिलेने 14 दिवस घरात राहणे अपेक्षित होते.दरम्यान आज उपविभागीय अधिकारी प्रशांत खेडेकर, आखाडा बाळापूरचे सहाय्यक पोलिस निरीक्षक रवी हुंडेकर ,यांच्या पथकाने  कामठा, येडशीतांडा, कांडली, चाफनाथ, आडा या गावांना भेटी दिल्या. यावेळी श्री खेडेकर यांनी या गावांमधून गावकऱ्यांशी संवाद साधला गावकऱ्यांनी विनाकारण घराच्या बाहेर पडू नये तसेच स्वच्छता बाळगावी बाहेरगावाहून येणाऱ्या गावकऱ्यांना शाळेमध्ये क्वॉरंटाईन करून ठेवावे अशा सूचना दिल्या.

 

तर कामठा येथील भेटी मध्ये एक महिला होम क्वारंटाईन असतांनाही नांदेड येथे गेल्याचे गावकऱ्यांनी सांगितले. सदर महिलेवर तातडीने गुन्हा दाखल करण्याचे आदेश श्री. खेडेकर यांनी दिले. त्यानंतर ग्रामसेवक गोपाल तबडे यांनी आखाडा बाळापूर पोलिस ठाण्यात दिलेल्या  तक्रारीवरून सदर महिले विरुध्द आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. जमादार मधुकर नागरे पुढील तपास करीत आहेत.


 

 



 



Popular posts from this blog

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कृषी अधिकाऱ्याच्या दालनात आंदोलन

काकडदाभा येथे अनेकांचा आमदार बांगर यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश

ओमप्रकाश देवडा बँकेला ३.१५ कोटीचा निव्वळ नफा