धक्कादायक : परभणी जिल्ह्यात आज 07 कोरोना पॉझिटिव्ह.
परभणी प्रतिनिधी- परभणी जिल्ह्यात शुक्रवारी रात्री दहा वाजेपर्यंत सात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडल्याने जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा पुन्हा चांगलीच हादरली आहे, दरम्यान जिल्ह्यातील एकूण कोरोना रुग्ण संख्या 74 वर गेली आहे. परभणी जिल्ह्यात गुरुवार हा दिलासादायक ठरला होता. परंतु शुक्रवारी पुन्हा एकदा जिल्ह्याला मोठा हादरा बसला आहे.जिल्ह्यात शुक्रवारी रात्री दहा वाजेपर्यंत एकूण सात कोरोना रुग्ण सापडल्याने आरोग्य विभागासह अन्य यंत्रणा चांगलीच हादरली आहे. जिल्ह्यात आज जिंतूर 2, मानवत 1,सेलू 2 गंगाखेड 2 असे रुग्ण सापडले आहेत. यामुळे जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेला पुन्हा एकदा कोरणा सारख्या आजाराला तोंड द्यावे लागत आहे. रुग्ण सापडलेले संबंधित गाव रात्री उशिरापर्यंत सील करण्यात आले. शनिवारी सकाळी गावात निर्जंतुकीकरण फवारणी करण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी तात्काळ ही गावे प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित केली आहे. या गावांमध्ये ये-जा करण्यासाठी पूर्णपणे मनाई करण्यात आली आहे. जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी तालुका प्रशासन पूर्णपणे गावांना सहकार्य करणार आहे. त्यामुळे ग्रामस्थांनी गावाबाहेर जाणे टाळावे.शिवाय सापडलेल्या रुग्णांचे अन्य कोणा कोणाशी संबंध आलेले आहेत याचाही तपास जिल्हा आरोग्य यंत्रणेच्या वतीने घेण्यात येत आहे. नांदेड येथील प्रयोगशाळेतून दोन-तीन दिवस रिपोर्ट यायला लागत असल्यामुळे कोरणा रुग्ण सापडण्यात मोठी अडचण निर्माण होत आहे. परभणी जिल्हा रुग्णालयात तात्काळ कोरोना चाचणी झाल्यास संबंधित रुग्णांचे होणारे हाल टाळता येऊन त्यांचा अन्य लोकांशी होणारा संपर्क देखील थांबविता येईल असाही सूर यावेळी काही सुज्ञ नागरिकांकडून ऐकावयास मिळत होता.