परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन नागरिकांनी सहकार्य करावे . – प्रवीण मेंगशेट्टी 

परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन नागरिकांनी सहकार्य करावे . – प्रवीण मेंगशेट्टी 


उदगीर   ( संगम पटवारी )


कोरणा विषाणू प्रतिबंधक उपाय योजना अंतर्गत उदगीर शहरामध्ये स्वतंत्रपणे दोन विभाग बनवून ते विभाग पूर्णपणे प्रतिबंधीत भाग म्हणून जाहीर करण्यात आले असून शासनाचे पुढील आदेश येईपर्यंत या प्रतिबंधित क्षेत्रात कोणीही  जाऊ नये. तसेच शहरात पुढील आदेश येईपर्यंत संचारबंदी लागू राहणार आहे. या काळात प्रतिबंधित क्षेत्र वगळुन शहराती ईतर भागात सकाळी सात ते अकरा वाजेपर्यंत अत्यावश्यक वस्तू खरेदीसाठी सूट देण्यात येणार आहे. मात्र कोणीही अनावश्यक रस्त्यावर फिरू नये  अन्यथा त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. असा इशारा उपविभागीय पोलीस अधिकारी तथा इन्सिडेंट कमांडर प्रवीण मेंगशेट्टी यांनी दिला आहे. उपविभागीय दंडाधिकारी उदगीर यांच्या कार्यालयाच्या नैसर्गिक आपत्ती विभागाच्यावतीने नुकतेच एक पत्र जारी केले असून या प्रतिबंधक क्षेत्रांमध्ये येण्यास व जाण्यास फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे तरतुदीनुसार निर्बंध व मज्जाव घालून मनाईहुकूम आचे आदेश लागू करण्यात आलेले आहेत. उदगीर विभागातील उदगीर शहरात शासनाने समूह कृती आराखडा बनवून कारवाईच्या अनुषंगाने दिलेल्या आवश्यक त्या सूचना यामध्ये पोलिस बंदोबस्त ,तपासणी नाके इत्यादी बाबी मुख्याधिकारी नगरपरिषद उदगीर यांनी आवश्यक ती कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या भागामध्ये अत्यावश्यक सेवा पुरवठ्याबाबत आवश्यक ती व्यवस्था व कार्यवाही नगरपालिका प्रशासनाच्या वतीने करण्याचे निर्देशित करण्यात आलेले आहेत. अत्यावश्यक सेवा पुरवठा करतानादेखील सोशल डिस्टन्स पाळणे आवश्यक आहे. तसेच इतर आरोग्यविषयक नियमांचे पालन करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. सदर मनाईहुकूम आदेशाच्या कालावधीत सर्व शासकीय कार्यालय, त्यांचे कर्मचारी, त्यांची वाहने, सर्व शासकीय वाहने, सर्व शासकीय व खाजगी दवाखाने, सर्व औषधी दुकाने ,शासकीय निवारा गृह, अत्यावश्यक सेवेसाठी पास घेतलेले वाहने व व्यक्ती, वैद्यकीय आपत्कालीन सेवा यांना मुभा राहणार आहे. उदगीर शहरातील कंटेनमेंट प्लान 2 च्या अनुषंगाने मुसानगर आणि पीरमुसानगर या दोन भागात त्यांच्या अखत्यारीतील सीमा बंद करण्यात आलेले आहेत. क्लस्टर कंटेनमेंट प्लॅननुसार शासनाकडून निर्गमित सूचनेनुसार कारवाई करण्याबाबत आदेशित करण्यात आलेले आहे .या क्षेत्रांमध्ये दिनांक 30 एप्रिल रोजी सदर आदेश निर्गमित झाल्यापासून 13 मे 2020 पर्यंत कोणासहु येण्यास, फिरण्यास मज्जाव करण्यासाठी फौजदारी प्रक्रिया सहिता 1973 चे कलम 144 अनुसार मनाईहुकूम आदेश लागू करण्यात आला आहे. तसेच सदर क्षेत्रामध्ये येण्यास व जाण्यास फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे तरतुदीनुसार मज्जाव घालण्यात येऊन मनाईहुकूम आदेश लागू करण्यात आला आहे. या कंटेमनेंट प्लांन चे क्षेत्र वगळून उर्वरित उदगीर शहरात 28 एप्रिल पर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली होती, शहरातील सद्य परिस्थितीचे अनुषंगाने प्राप्त झालेल्या अधिकारानुसार इन्सिडेंट कमांडर तथा उपविभागीय दंडाधिकारी यांनी स्पष्ट केले आहे की, पोलीस विभागाच्या अहवालानुसार सदर क्षेत्रातील संचारबंदी पुढील आदेशापर्यंत वाढवण्यात येत आहे. सदर संचारबंदी च्या आदेशाच्या कालावधीत सर्व शासकीय कार्यालये, त्यांच्या कर्मचारी, त्यांची वाहने, औषधी दुकाने ,शासकीय निवारा ग्रह, घरपोच गॅस सेवा, घरपोच पाणी पुरवठा , वैद्यकीय आपत्कालीन सेवा इत्यादींना अनुमती दिली आहे. तसेच दूध वितरण , रास्त भाव दुकाने, पिठाची गिरणी, किराणा मालाची दुकाने यांना सकाळी सात ते अकरा वाजेपर्यंत मुभा देण्यात आली आहे. सदरील  अत्यावश्यक व्यवस्थेबाबत मुख्याधिकारी नगरपरिषद यांना आवश्यक ती कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच शहरातील समाविष्ट ग्रामीण भागातील सोमनाथ व निडेबन ग्रामपंचायत पूर्णतः व मादलापुर पूर्व, मलकापूर या ग्रामपंचायतीचा शहराशी संलग्न अशत: क्षेत्रात अत्यावश्यक सेवा बाबतची कारवाई गटविकास अधिकारी व ग्रामसेवक यांनी करावी. असे आदेशित केले आहे.


Popular posts from this blog

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कृषी अधिकाऱ्याच्या दालनात आंदोलन

काकडदाभा येथे अनेकांचा आमदार बांगर यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश

ओमप्रकाश देवडा बँकेला ३.१५ कोटीचा निव्वळ नफा