सावत्र मुलाद्वारे वडिलाचा खून
सावत्र मुलाद्वारे वडिलाचा खून
परभणी,
गावंडे, जि. प्रतिनिधी
शहरातील विकासनगर भागात शनिवारी(दि.2) दुपारी साडेतीनच्या सुमारास एका सावत्र मुलाने आपल्या वडिलाचा धारधार शस्त्राचे वार करीत खून केल्याची घटना उघडकीस आली.
दरम्यान, याप्रकरणात कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून संबंधीत आरोपीस पोलिसांनी अटकही केली आहे.
विकासनगर भागातील युसुफ खान अब्दुल मजीद खान पठाण (वय53) हे घरात झोपले होते. त्यावेळी त्यांच्या दुस-या पत्नीचा मुलगा मैनू खान याने त्यांच्या छातीवर आणि पोटावर चाकूचे वार केले. त्यात ते गंभीर जखमी झाले. कुटुंबियांनी तातडीने रूग्णालयात आणले परंतू ते मृत्यू पावले होते. कोतवाली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेवून आरोपीस ताब्यात घेतले आहे. सहाय्यक पोलिस अधीक्षक नितीन बगाटे यांनी घटनास्थळी भेट दिली. कौटुंबिक वादातून हा प्रकार घडल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.