दिलासादायक ; हिंगोलीत आणखी आठ रुग्णांची कोरोनावर मात 

दिलासादायक ; हिंगोलीत आणखी आठ रुग्णांची कोरोनावर मात


कोरोना रुग्णांना लागली उतरती कळा


हिंगोली -   मुंबई, जालना येथून बंदोबस्तवरून परतलेल्या सात
 एसआरपीएफ जवनासह अन्य एकाचा अहवाल बुधवारी निगेटिव्ह आल्याने ८ रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने कोरोना बाधित रुग्णाला उतरती कळा लागल्याने जिल्हा प्रशासनामध्ये समाधान व्यक्त होत आहे.यामुळे जिल्हा ग्रीन झोनकडे  वाटचाल करीत आहे.


जिल्ह्यात एकूण एसआरपीएफचच्या ९१ जवानांना कोरोनाची लागण झाल्याचे अहवालावरून स्पस्ट झाले होते. यातील आतापर्यंत ४६ रुग्ण  बरे झाल्याने त्यांना सुट्टी देण्यात आली. त्यामुळे पॉझिटिव्ह रुग्ण संख्येत उतरती कळा लागल्याने आजघडीला केवळ ४५ रुग्ण पॉझिटिव्ह आहेत. दरम्यान, जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार घेत असलेल्या एकूण जवणापैकी सात जवानांचे व सेनगाव येथील एकाचा स्वाब नमुने अहवाल  निगेटिव्ह आल्याने या आठ रुग्णांना सुट्टी देण्यात आली.


आता एकूण भरती असलेल्या ४४ जवाना पैकी ४३ जवान हे हिंगोली तर एक जवान हा जालना येथील असून त्याच्यावर आयसोलेशन वॉर्डात उपचार सुरु असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्रीवास यानी दिली. तसेच यात उर्वरित एक परिचारिका असून एकूण सुमारे ४५ कोरोना बाधित रुग्णावर उपचार सुरू आहेत. दरम्यान, आयसोलेशन वॉर्डात भरती असलेल्या जवानांची प्रकृती स्थिर असून कोणतेही गंभीर लक्षणे नसल्याचे सांगून नऊ एसआरपीएफ जवानांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना औरंगाबाद येथे खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.


आतापार्यंत आयसोलेशन वॉर्ड व जिल्ह्यातील कोरोना सेंटर मध्ये एकूण १४०२ व्यक्तींना भरती केले आहे. त्यापैकी १३०३ व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले असून ,१५२७ व्यक्तींना  सुट्टी देण्यात आली आहे. आजघडीला१३५ व्यक्ती सेंटर मध्ये भरती आहेत. यापैकी१४ जणांचे अहवाल आद्यपही येणे बाकी असल्याचे डॉ. श्रीवास यांनी सांगितले.


Popular posts from this blog

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कृषी अधिकाऱ्याच्या दालनात आंदोलन

काकडदाभा येथे अनेकांचा आमदार बांगर यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश

ओमप्रकाश देवडा बँकेला ३.१५ कोटीचा निव्वळ नफा