शहरातील गल्‍लीबोळातील रस्‍ते वाहतुकीसाठी बंद ,मुख्य रस्त्याचाच होणार वापर

शहरातील गल्‍लीबोळातील रस्‍ते वाहतुकीसाठी बंद ,मुख्य रस्त्याचाच होणार वापर


हिंगोली नगरपरिषदेने लावले बॅरिकेट,सीसीटीव्हीची राहणार करडी नजर


हिंगोली -  कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात आपतकालीन परिस्‍थिती व संचारबंदीमुळे नागरिकांना घराच्या बाहेर पडण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. त्‍याअनुषंगाने मंगळवारी शहरातील गल्‍लीबोळातील रस्‍ते बंद करून रस्त्यावर  बॅरिकेट लावण्यात आले आहेत. त्यामुळे केवळ मुख्य रस्‍ता वाहतुकीसाठी ठेवण्यात आला असून, सीसीटीव्हीची नागरिकांवर करडी नजर राहणार असल्याची माहिती सीओ पाटील यांनी दिली.


कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आटोक्‍यात आणण्यासाठी राज्यात आपतकालीन परिस्‍थिती व संचारबंदीची घोषणा केल्यानुसार  जिल्ह्यात कोरोनाचा पादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी ,पोलीस अधीक्षक योगेशकुमार, महसूल विभाग ,आरोग्य यंत्रणा यांच्या मार्गदर्शनाखाली  सीओ रामदास पाटील यांनी  शहरातील गल्‍ली बोळात रहदारीचा वावर न होता अत्यावश्यक कारणासाठी केवळ मुख्य रस्‍त्‍यावरच वाहतूक होण्यासाठी मंगळवारपासून मुख्य रस्‍ते तेवढे वाहतुकीसाठी खुले राहणार असून, उर्वरित सर्व रस्‍ते बॅरिकेट लावून बंद करण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले.


बॅरिकेट लावलेल्या रस्‍त्यावर वाहतुक करण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. त्‍यानुसार शहरातील मुख्य रस्‍त्‍यात  अग्रसेन महाराज चौक ते खटकाळी बायपास, अग्रसेन महाराज चौक ते औंढा रोड, अग्रसेन महाराज चौक ते अंबिका टॉकीज, अग्रसेन चौक ते रेल्‍वे पुल ते वाशीम रोडचा समावेश आहे. तर उपरस्‍त्‍यात टेहरे हॉस्‍पीटल ते एनटीसीकडे जाणारा रस्‍ता, रामाकृष्ण लॉज ते कोथळज रोड, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर चौक ते एनसीपी भवनाकडे जाणारा रास्‍ता, केमीस्‍ट भवन बाजुचा लोटस मॉलकडे जाणारा रस्‍ता, जिनमातानगर कडे जाणारा रस्‍ता.तसेच जिनमाता नगरकडे जाणारा रस्‍ता, बावनखोलीकडे जाणारा रस्‍ता, कब्रस्‍तान ते मेहराजुलुमकडे जाणारा रस्‍ता, कयाधूनदी पुल ते वंजारवाडा येथे जाणारा रस्‍ता, मेहराजुलुम मस्‍जिद रस्‍ता, श्रीमान श्रीमती कापडदुकानाकडे जाणारा रस्‍ता, जवाहररोडकडे जाणारा रस्‍ता व्हाया खुराणा पेट्रोपंप ते रेल्‍वेस्‍थानकाकडे जाणारा रस्‍ता, इंदिरा गांधी चौक ते शिवाजीनगर चौक, अंबिका टॉकीज ते गाडीपुराकडे जाणारा रस्‍ता, पिपल्‍स को-ऑपरेटीव्ह बँक ते आखरे मेडीकल रस्‍ता, माधव हॉस्‍पीटल व्हाया कोर्ट ते अग्रसेन चौक रस्‍ता, सीटीकल्‍ब या अठरा रस्‍त्‍याचा समावेश आहे. 


नागरिकांनी अत्यावश्यक कारणासाठी बाहेर पडल्यास या रस्‍त्‍याचा वापर करावा अनावश्यक बाहेर पडूनये, सोशल डिस्‍टसींगचे पालन करावे अन्यथा नियमाचे उल्‍लंघन करणाऱ्या विरुध्द कायदेशीर कारवाई करण्यात येईल तसेच सर्वठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे देखील लावण्यात आले आहेत. प्रतिबंधीत केलेल्या रस्‍त्‍यावरील बॅरीकेटींगची तोडफोड, नासधुस केल्याचे दिसुन आल्यास संबधीताविरुध्द फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येईल याची नागरीकांनी नोंद घ्यावी असे आवाहन मुख्याधीकारी रामदास पाटील यांनी केले आहे.


Popular posts from this blog

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कृषी अधिकाऱ्याच्या दालनात आंदोलन

काकडदाभा येथे अनेकांचा आमदार बांगर यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश

ओमप्रकाश देवडा बँकेला ३.१५ कोटीचा निव्वळ नफा