दिलीप चव्हाण यांना उपमुख्यमंत्री अजीत पवार यांचा सल्‍ला

दिलीप चव्हाण यांना उपमुख्यमंत्री अजीत पवार यांचा सल्‍ला


जिल्‍ह्‍यातील नागरीक, कुटूंबासह  स्‍वतःची काळजी घ्या 


हिंगोली -  कोरोना विषाणुजन्य आजाराच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजीत पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्‍हाध्यक्ष दिलीप चव्हाण यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधत जिल्‍ह्‍यातील परिस्थिती जाणून घेतली  चव्हाण यांनीही प्रशासन व आरोग्य विभागाकडून करण्यात आलेल्या उपाय योजना संदर्भात उपमुख्यमंत्र्यांना माहिती दिली. यावेळी मतदारसंघातील नागरिकांना सोशल डिस्टन्सचे पालन करण्याचे सांगत  काळजी घेण्याचा सल्लाही  दिला.


कोरोना विषाणूजन्य आजाराचा संसर्ग व त्यानंतरची निर्माण झालेली परिस्थिती पाहता सर्वच कामकाज ठप्प झाले आहे. या स्थितीत उपमुख्यमंत्री अजीत पवार यांनी संकटाच्या काळात राज्यातील परिस्थिती व्यवस्‍थीत सांभाळत सर्व प्रशासकीय यंत्रणा कामात असून त्यावर नियंत्रण आहे. सर्वसामान्य नागरिक, पक्षाचे पदाधिकारी, आमदार, खासदार यांच्यासह नागरीकांशी संपर्क ठेवला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्‍हाध्यक्ष दिलीप चव्हाण यांना उपमुख्यमंत्र्यांनी दूरध्वनी करून कोरोना पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील परिस्थिती जाणून घेतली यावेळी दिलीप चव्हाण यांनी उपमुख्यमंत्र्यांना हिंगोली शहरासह जिल्‍ह्‍यात राज्य शासनाकडून करण्यात आलेल्या उपाययोजना संदर्भात माहिती जाणून घेतली.


यावेळी उपमुख्यमंत्र्यांनी तुमच्या जिल्‍ह्यात पॉझीटीव्ह असलेल्याच्या तब्‍बेती बाबत माहिती घेतली . तसेच एका पॉझीटीव्हचे अहवाल दोन वेळेस निगेटीव्ह आल्यानंतर त्‍याला घरी सोडण्यात आल्याची माहिती  चव्हाण यांनी त्‍यांना दिली. आरोग्य विभागाकडून राबवत असलेल्या उपाययोजना संदर्भात देखील माहिती देण्यात आली. त्‍यानंतर उपमुख्यमंत्री अजीत पवार यांनी स्‍वतःची काळजी घ्या खरीपपुर्व कामे सुरू झाल्याने त्‍यांनी आपण शेती कामासाठी परवानगी दिली आहे. कामे करताना सोशल डिस्‍टन्स बाळगावा तसेच मास्‍क, हॅन्डग्लोजचा वापर करावा असे सांगितले. 


दरम्‍यान, दिलीप चव्हाण यांनी उपमुख्यमंत्री अजीत पवार यांना शहरात जंतूनाशकाची फवारणी केली असून  गरजुंना अन्नधान्याच्या पुरवठा केला आहे. नगरपालिका प्रशासनातर्फे मदत संकलन केंद्रामार्फत सर्व गरजुपर्यत जमा झालेली मदत पोहचत आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून देखील गरजुंना मदत केल्याची माहिती श्री. चव्हाण यांनी उपमुख्यमंत्री अजीत पवार यांना दिली.
आरोग्य विभागाकडे लक्ष ठेवण्याच्या सूचना  चव्हाण  यांना दिल्या. या बाबत  कुठल्याही अडचणी आल्यास तातडीने वैयक्तिक संपर्क करावा असे सांगितले. दरम्‍यान, उपमुख्यमंत्र्यांनी जिल्‍ह्‍यात साथ रोग उपायोजना व अंमलबजावणीचा आढावा घेतला. जिल्‍ह्‍यातील  नागरिकांना शासनाकडून देण्यात आलेल्या नियमाचे पालन करण्याचे आवाहन राष्ट्रवादीचे काँग्रेसचे जिल्‍हाध्यक्ष व उपनगराध्यक्ष म्‍हणून आपण करावे नागरिकांची काळजी घेत असतानाच स्वतःची व कुटुंबाची काळजी घेण्याचा सल्लाही उपमुख्यमंत्री अजीत पवार यांनी  चव्हाण यांना दिला.


Popular posts from this blog

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कृषी अधिकाऱ्याच्या दालनात आंदोलन

काकडदाभा येथे अनेकांचा आमदार बांगर यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश

ओमप्रकाश देवडा बँकेला ३.१५ कोटीचा निव्वळ नफा