पोलीस खात्यास विनंती आपल्या " लाठीची " गरज नाही,  आपल्या " काठीची " गरज आहे.

पोलीस खात्यास विनंती


                  पोलीस खात्यास विनंती  


आपल्या " लाठीची " गरज नाही,  


आपल्या " काठीची " गरज आहे.                                                                   संपादक :  नरसिंह घोणे 


 


            सध्या भूतलावर प्रत्येक नागरीकाच्या मनात  " कोरोना " या नावाचे राक्षस प्रत्येकाच्या मानगुटीवर येवून बसले आहे, कधी ते नरड्यात उतरून जिव घेवून जाईल अशी भिती निर्माण झाली आहे.  या मध्ये ब्रिटनसारख्या देशाचा पंतप्रधानही सुटला नाही, तर कोण कलाकार, श्रीमंत की गरीब हे ही तो पहात नाही. नव्वद दिवसात मृत्युची संख्या एक लाखावर पोंहचली असुन संशयीतचा दहालाखावर आकडा गेला आहे. चीन, अमेरीका, इटाली, फ्रान्स पासुन भारता पर्यंत प्रत्येक देश लॉकडाऊन झाले आसुन पत्येक देशातील नागरीक घरामध्ये अडकून पडला आहे. करोडो नागरीक नौकरी गेल्यामुळे बेरोजगार झाले आहेत, लॉकडाऊन कधी संपेल ? हे सध्या तरी कोणही सांगु शकत नाही. 
     


          " कोरोना " रोगाचा प्रादुरभाव होवू नये म्हणून आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवार, दिनांक 22 मार्च 2020 रोजी ङ्ग जनता कर्फ्युचे ङ्घ आवाहन केले व जनतेने संपूर्ण जगात कोरोनाचा वाढता कहर पाहून किंवा घाबरून रविवार असल्याने घरातच रहाणे पसंत केले व अक्षरशः संपूर्ण भारतातील रस्ते निर्मणुष्य, ओसाड पडले आहेत, तर या मध्येही कांही टवाळखोर असतातच... ते ज्यावेळी रस्त्यावर उतरले होते त्यावेळी त्यांना पोलीसांनी लाठीचा प्रसाद देत घर गाठण्यास भाग पाडले हे टि.व्ही न्युजच्या माध्यमातून पाहिले आहे, " जनता कर्फ्यु " असुन देखील  पोलीसांनी केलेला लाठीचा मारही हसत हसत सहन केला, कारण प्रत्येकाला कोरोनाची भिती व पंतप्रधानानी केलेले अवाहान होते तर ङ्ग सोशल डिस्टन्स ङ्घ प्रत्येकानी राखून एक दिवस काढावा जेनेकरून भविष्यात लॉकडाऊनची गरज भासल्यास प्रत्येकाच्या पाठीशी अनुभव असावा म्हणून...
 


पहाता पहता कोरोना रोगाने भारतात पाय पसरविण्यास सुरूवात केली आणि पहाता पहाता 100 वर अकडा जाऊन पोहंचताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 21 दिवसाचे मंगळवार 14 एप्रील 2020 पर्यंत संपूर्ण देश लॉकडाऊन केल्याचे जाहिर केले, परंतू या गोष्टीचे प्रत्येक भारतीयांना विशेष वाटले नाही कारण परिस्थीतीही तशीच होती. परंतू पहिले पाच सहा दिवस कांही वाटले नाही परंतू पुढील प्रत्येक दिवस हा 18,19....21 दिवस म्हणन्यापर्यंत मोजण्या पलीकडे कोणाच्याही हाती नव्हते. या 21 दिवसात संपूर्ण देशात डॉक्टर, नर्ससह संपूर्ण वैद्यकीय यंत्रणा, महानगरपालीका-नगरपालीका कर्मचार, इतर सफाही कामगार, पोलीस कर्मचारी, मेडीया, हेच रस्त्यावर होते, या मध्ये कोरोना रोगा पेक्षा भयंकर वागणारी गर्दी वरचेवर रोडवर येत असताना पोलीसांनी आपले रंगही दाखवायला सुरवात केली लाठी की भाषा जनतेला समजु लागली, 135 कोटीवर लोकसंख्या असलेल्या देशात ऐवढे होणारच....
 


           परंतू आज 14 एप्रील 2020 दिवस हा ममभारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर ङ्घ यांच्या जयंतीचा दिवस, संपूर्ण देशात ही जयंती उत्साहात साजरी केली जाते. तरीही जयंती घरातच साजरी करावी लागत असली तरी देशाच्या हितासाठी मनमारून घरातच जयंती साजरी करण्याची प्रत्येक नागरीकाने मनाने तयारी आगोदरच केली होती. व उत्साहही होता कारण आज लॉकडाऊन उठणार आणि मनसोक्त  खरेदी, 21 दिवस जिभीवर बंधन घालून घरातीलच केलेल्या जेवणावर नाईलाजास्तव ताव मारून काढलेल्या दिवसाचा शेवट होता परंतु देशातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पहाता पुढील काळ किमान पुन्हा 15 ते 21 दिवस लॉकडाऊन होणार याची चिन्ह वाटू लागल्याने व महाराष्ट्रात मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी आगोदरच 30 एप्रील पर्यंत लॉकडाऊनची घोषणा केली तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 03 मे 2020 पर्यंत लॉकडाऊनची घोषणा करताचा मजुर, हातावर पोट असणारे, गोर, गरीब, वयोवृध्द यांना जनु आभाळच कोसळल्यासारखे झाले आहे तर देव पाण्यात ठेवून बसलेले नशेबाज हे एैकताच चक्राहुनही गेले असतील किंवा भूरळ येवून पडलेही असतील ....
 गोर-गरीब, मजुर हातावर पोट असणारे मात्र चल-बिचल तर झालेच परंतु त्यांची परिस्थीती अशी आहे की, रोजची खाण्यापिण्याचे वांदे असतानाही देशातील परिस्थीती पहात जनतेने सावकाराकडून, शेजारी, पाजारी यांच्याकडून हातऊसणे, व्याजी  पैसे घेवूण लागणारी खरेदी करण्यासाठी वेळोवेळी दिलेल्या शासकीय निर्देशानुसार जनतेने भाजी, किराणा, औषधे अणण्यासाठी जात असताना पोलीसांची आदरयुक्त भिती बाळगुन घराबाहेर पडत, परंतु लॉकडाऊन 15 दिवस वाढले गेल्याने दररोजच्या लागणार्‍या सामान खरेदीसाठी बाजारात नागरीक जात आहेत, त्यावेळी कांही पोलीस समजावून सांगून जनतेस मदत करत आहेत तर कांही पोलीस हे आपला पोलीसी खाक्याचा वापर करत लाठीचा वापर करत आहेत, हा आता आतीरेक होत असल्याचे दिसत आहे. शासनाने दररोजसाठी कांही अंशी सुट दिलेल्या शेती व्यवसाय, वैदकीय क्षेत्र, औजारे, मेकॅनिक, कृषी दुकाने तर शासकीय, निमशासकीय कर्मचारी, नगर पालीकेचे कर्मचारी, महानगर पालीकेचे कर्मचारी,स्वच्छता कर्मचारी ही सर्व मंडळी किमान जिल्ह्याच्या लोकसंख्येच्या किमान 7 ते 10 टक्के आहे आणि ती नियमानुसार वेळेचे बंधन राखुन रस्त्यावर आल्यानंतर थोडी फार गर्दी दिसणारच परंतू या दोन दिवसात कांही पोलीस समोरून कोण आहे न पहाता पाठीवर लाठीचार्ज करत आहेत किंवा त्या व्यक्तीची बाहेर पडण्याची गरज आहे किंवा नाही या बाबत त्याव्यक्तीशी चर्चा न करता पाठीमाघुन लाठी घालत आहेत या प्रसादाची गरज कशासाठी? किराणा, भाजी, फळे दुकानदार यांना दिलेल्या वेळे आधीच दुकानासमोर उभारलेल्या, रस्त्याने जाणार्‍यांना पाठीमागुन लाठीचा प्रसाद देवून पुन्हा विचारणे, कोठे चाललास ?  हे काय ? आशा प्रश्‍नाचा भडीमार करणे हे योग्य नाही. संपुर्ण विश्‍वासह, भारत, महाराष्ट्र, व आपला जिल्हा संकटात असताना व जनतेची आर्थिक परिस्थीती नाजुक झाली असताना पोलीसांचा मार आता सहन होत नाही...पोलीसांनी आता आपल्यातील माणूस जागा करणे गरजेचे आहे, जनतेचा सन्मान करणे आता गरजेचे आहे. हे ही दिवस जातीलच पोलीस खात्यावरील तानही कमी होईल परंतू पाठीमागे लाठीची लागलेली वळ त्या वयोवृध्दाला, मुलाला किंवा आपल्यातीलच जनसेवेत असणार्‍या कर्मचार्‍याला कायम स्मरणात राहील. 
 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या कठीन परिस्थीतीत प्रत्येक अत्यावश्यक सेवेतील कर्मचार्‍यांचा सन्मान करण्यासाठी सांगीतले व याचे सर्व जनतेने आदराने पालन केले. तर या मध्ये माध्यमातील पत्रकारांनाही सन्मान योग्य समजले परंतु पोलीसांनी पत्रकारांनाही सोडले नाही याची खंत वाटते 


 म्हणूनच पोलीस कर्मचार्‍याला विनंती आहे आपल्या    
" लाठीची " गरज नाही, तर आपल्या " काठीची " गरज आहे,  ही काठी वयोवृध्दाचा आधार असते दिव्यांग व्यक्तीचा सहारा असते तशी आपण लाठीचा उपयोग करू नका आदर युक्त काठीने मार्ग दाखवा, काठी हातात ठेवूनच विचारा कुठे, का, कशाला आला ?  सामान खरेदीसाठी सोशल डिस्टन्स साठी मदत करा व त्याची खरेदी झाली की त्यास मार्गस्थ करा. तो आपआपल्याच विवंचनेत असलेला गुपचुपच आल्या मार्गे निघुन जाईल. परंतु आपल्या तिसर्‍या डोळ्यातून दिसणारा गुंड, भामटा यांना सोडू नका. दहा गुन्हेगार सुटले तरी चालतील परंतु एकही निरपराध आपला बळी न ठरला पाहिजे हे तितकेच खरे. लाठी नको काठी द्या !


Popular posts from this blog

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कृषी अधिकाऱ्याच्या दालनात आंदोलन

काकडदाभा येथे अनेकांचा आमदार बांगर यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश

ओमप्रकाश देवडा बँकेला ३.१५ कोटीचा निव्वळ नफा