जिल्ह्यातील बारा जणाचा दिल्लीच्या कार्यक्रमात सहभाग
जिल्ह्यातील बारा जणाचा दिल्लीच्या कार्यक्रमात सहभाग
एकजण हिंगोलीत परतला, सामान्य रुग्णालयात दाखल,उर्वरित अकरा जण दिल्लीतच ठोकला मुक्काम
हिंगोली - जिल्ह्यातून दिल्ली येथे झालेल्या तबलिगे जमात संस्थेच्या एका धार्मिक कार्यक्रमात बारा जण गेले होते. त्यापैकी अकरा जण दिल्लीतच असून त्यापैकी एक जिल्ह्यात परत आला आहे. तो जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल झाला आहे. त्याचे स्वॅब नमुने औरंगाबाद येथे तपासणीसाठी पाठविले असल्याची माहिती जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी दिली आहे.
दिल्ली येथे निजामुद्दीनमध्ये झालेल्या एका धार्मिक कार्यक्रमाला जिल्ह्यातून बारा नागरीक गेले होते. त्यापैकी अकरा जण दिल्ली येथेच थांबले आहेत. त्यापैकी एक जण हिंगोली येथे परतला आहे. त्याला जिल्हा सामान्य रुग्णालयातील आयसोलेशन वार्डात भरती करण्यात आले आहे. सदरील रुग्णावर उपचार सुरू आहेत. त्याचे स्वॅब नमुने औरंगाबाद येथे वैद्यकिय महाविद्यालयात तपासणीसाठी पाठविण्यात आल्याचे जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी सांगितले. दरम्यान ,जिल्हा सामान्य रुग्णालयात असलेल्या दोन कोरोना संशयिताचा अहवाल बुधवारी येणे बाकी होता तो सहा वाजेपर्यत आला नव्हता तो सात वाजेपर्यत येणार असल्याचे डॉ. गोपाल कदम यांनी सांगितले. त्यामध्ये दिल्ली येथून आलेल्या एका नागरीकाचा समावेश आहे.