परभणीतील कोरोना बाधिताचे  रेडगावशी कनेक्शन

परभणीतील कोरोना बाधिताचे
 रेडगावशी कनेक्शन


हिंगोली -  परभणी येथे गुरुवारी कोरोना बाधित रुग्ण आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. मात्र या रुग्णाचे कनेक्शन रेडगावशी असल्याने पुन्हा जिल्हा प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे. 


वसमत येथे मर्कज येथून आलेल्या संशयिताला खोकला व ताप अशी कोरोनासी साम्य असलेली लक्षणे दिसून येत असल्याने त्यास जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता त्याचे स्वाब नमुने प्रयोग शाळेत पाठविले असता त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यानंतर त्याच्यावर औषधी उपचार सुरु होते. पुन्हा नमुने  तपासणी साठी पाठविले असता त्यांचा अहवाल मंगळवारी निगेटिव्ह आला असून दुसरा अहवाल येणे अपेक्षित असल्याने जिल्हा प्रशासनाने सुटकेचा निश्वास सोडला होता.परंतु परभणी येथे पुणे येथून पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने पुन्हा चिंता वाढली आहे.


पहिल्या २१दिवसाच्या लॉकडाऊन काळात परभणी हा ग्रीन झोन मध्ये होता. मात्र अचानक गुरुवारी परभणी येथे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने संपूर्ण यंत्रणा अलर्ट झाली आहे.परंतु या पॉझिटिव्ह रुग्णाची तपासणी व चौकशी केली असता या रुग्णाचे हिंगोली जिल्ह्यातील
 रेडगाव येथे नातेवाईक असल्याचे कळताच आरोग्य विभागातील पथकाने तातडीने रेडगाव गाठून त्या पाचही जणांना कळमनुरी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असून त्याचे स्वाब नमुने औरंगाबाद येथील प्रयोग शाळेकडे पाठविले जाणार असून, त्यांचा अहवाल आल्यानंतरच स्पस्ट होईल असे सूत्रांनी सांगितले.अगोदरच हिंगोली जिल्हा प्रशासनाने कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विविध उपाय योजना राबविल्या जात असताना नागरिकांना थोडे सुद्धा गांभीर्य दिसून येत नाही.


Popular posts from this blog

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कृषी अधिकाऱ्याच्या दालनात आंदोलन

काकडदाभा येथे अनेकांचा आमदार बांगर यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश

ओमप्रकाश देवडा बँकेला ३.१५ कोटीचा निव्वळ नफा