खबरदार घराबाहेर फिरताना  आढळून आल्यास  कारवाई करणार

खबरदार घराबाहेर फिरताना  आढळून आल्यास  कारवाई करणार


बळसोंड ग्रामपंचायतचा नागरिकांना इशारा


हिंगोली -  कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी नागरिकांनी घरातच बसून राहावे, अन्यथा विनाकारण फिरताना बाहेर आढळून आल्यास आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार धडक कारवाई करण्याचा इशारा
 बळसोंड ग्रामपंचायतच्या वतीने दिला आहे.


दरम्यान ,कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात शुक्रवार ता.३ते ५ एप्रिल या कालावधीत ५६५ ग्रामपंचायत मध्ये लॉक डाऊन करण्यात आले असून या दरम्यान मेडिकल दुकाने वगळून  भाजीपाला, किराणा दुकान,व इतर दुकाने बंद ठेवण्याचे आदेश पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी यांना देण्यात आले आहेत. त्यानुसार ग्रामपंचायत स्तरावर ग्रामसेवक यांनी कोरोनाचा बचाव करण्यासाठी संचारबंदी काळात परवानगी घेतलेल्या व्यक्ती शिवाय इतर कोणतीही व्यक्ती घराबाहेर, रस्त्यावर विनाकारण फिरताना आढळून आल्यास त्या व्यक्तीवर कायद्याचे उल्लंघन केल्या प्रकरणी कारवाई करण्याचा इशारा बळसोंड ग्रामपंचायतचे ग्रामसेवक राजेश किलचे यांनी दिला आहे.


 बळसोंड अंतर्गत येणाऱ्या नागरिकांनी कोरोना विषाणू पासून बचाव करण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या नियमांचे काटेकोर पणे पालन करून आपले व आपल्या कुटुंबाचे घरात बसून काळजी घ्यावी, विनाकारण घराच्या बाहेर कोणीही पडू नये, बाहेरून आल्यानंतर सानिटायझरने स्वछ हात धुवावेत, असे आवाहन देखील बळसोंड 
ग्रामपंचायतच्या वतीने करण्यात आले आहे.


Popular posts from this blog

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कृषी अधिकाऱ्याच्या दालनात आंदोलन

काकडदाभा येथे अनेकांचा आमदार बांगर यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश

ओमप्रकाश देवडा बँकेला ३.१५ कोटीचा निव्वळ नफा