खासदार सुप्रियाताई कडून हिंगोलीच्या वाहतूक शाखेला सॅल्यूट
खासदार सुप्रियाताई कडून हिंगोलीच्या वाहतूक शाखेला सॅल्यूट
मोकाट जनावरांना चारा टाकतानाचा फोटो फेसबुकवर केला शेअर
हिंगोली - लॉकडाऊन मुळे शहरातील मोकाट जनावरांचा प्रश्न ऐरणीवर आला असताना वाहतूक शाखेच्या पोलिसांनी माणुसकी दाखवत जनावरांना चारा टाकतानाचा फोटो शेअर करीत खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह आमदार रोहित पवार यांनी हिंगोली पोलिसांना सॅल्यूट केला आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात संसर्ग होऊ नये यांची खबरदारी घेत नागरिकांना घरात सुरक्षित राहण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. तर दुसरीकडे किराणा, मेडिकल, भाजीपाला वगळता सर्व आस्थापना बंद करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे एरव्ही रस्त्यावर नागरिका ऐवजी मोकाट जनावरांचा सुळसुळाट पहावयास दिसत आहे.
जिल्ह्यात कोरोना संसर्ग पसरवू नये यासाठी सर्वत्र लॉकडाऊन करण्यात आले. त्यामुळे गोरगरीब जनतेवर उपासमारीची वेळ येऊ नये यासाठी दानशूर व्यक्तीच्या पुढाकारातून पालिकेकडे धान्य पुरवठा केला जात आहे. त्यातून धान्याचे किट तयार करून गरजू नागरिकांना वाटप करण्याचे काम युद्धपातळीवर सुरु आहे. जिल्हाधिकारी रुचेश
जयवंशी ,पोलीस अधीक्षक योगेशकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूक शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोळकर यांच्यासह वाहतूक शाखेच्या पोलीस जवानांनी मुक्या प्राण्यावर उपासमारीची वेळ आल्याचे लक्षात घेत खाकी वर्दीचे दर्शन देत दुसरीकडे मात्र शहरात मोकाट फिरणाऱ्या मुक्या प्राण्यांचा प्रश्न ऐन लॉकडाऊनच्या काळात ऐरणीवर आल्याने देवाक काळजी र..असे म्हणत खाकी वर्दीतल्या पोलिसांनी माणुसकी दाखवत विक्री करणाऱ्या शेतकऱ्याकडून हिरवा चारा विकत घेत शहरातील इंदिरा चौक, नांदेड नाका, बसस्थानक परिसरातील मोकाट फिरणाऱ्या जनावरांना चारा दिल्याचा व्हिडीओ वॉट्सअप वरून शेअर झाल्याने तो व्हिडीओ खासदार
सुप्रियाताई सुळे, आमदार रोहित पवार यांच्याकडे प्राप्त होताच त्यांनी तेवढ्याच आपुलकीने हा व्हिडीओ आपल्या फेसबुकवर शेअर केला आहे. आणि हिंगोलीतील वाहतूक शाखेच्या प्रेरणादायी कार्याचे कौतुक करीत सॅल्यूट केला आहे.
एरव्ही नागरिकांचा पोलिसांकडे पाहण्याचा दृष्टीकोन वेगळा असतो, परंतु लॉकडाऊन ,संचारबंदीच्या काळात कोरोना या महाभयंकर रोगापासून नागरिकांना दूर राहण्यासाठी पोलीस स्वतःचे घर दार, मुलं बाळ, परिवार सोडून नागरिकांच्या जिवासाठी बाजी लावत रात्रंदिवस रस्त्यावर उतरून सुरक्षा करीत आहेत. मात्र काही नागरिक विना कामाचे रस्त्यावर फिरत आहेत. त्यामुळे त्यांना कठोर भूमिका घेणे अत्यावश्यक झाले आहे. मात्र एकंदरीत पोलीस दलाचे काम हे कौतुकास्पद असल्याचे खुद्द राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रियाताई सुळे यांनी केले आहे.