रास्तभाव दुकानातील धान्याचा लाभ नागरिकांनी घ्यावा

रास्तभाव दुकानातील धान्याचा लाभ नागरिकांनी घ्यावा


 तहसीलदार ज्‍योती पवार यांची माहिती


वसमत -  तालुक्यातील रेशन धान्याचे लाभार्थ्यांना नियमित  धान्य व प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेचा मोफत तांदूळ वाटपाचा रास्त भाव दुकानदाराकडून धान्याची उचल करून लाभ घेण्याचे आवाहन तहसीलदार ज्योती पवार यांनी केले आहे. 
 
वसमत तालुक्यातील सर्व लाभार्थी शिधापत्रिका धारकांना आवाहन करण्यात येते की माहे एप्रिल करिताचा प्राधान्य कुटुंब योजना व अंत्योदय कुटुंब योजनचे धान्य सर्व 168 दुकानदार याना तालुका गोदामातून पोहोच झाले असून शेतकरी कुटुंब योजना व प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेचा प्राधान्य कुटुंब व अंत्योदय कुटुंब याना प्रति सदस्य 5 किलो मोफत तांदूळ दुकानदार याना पोहोच करण्याचे काम वेगाने सुरू आहे. सर्व लाभार्थ्यांनी नियमित रेशन चे धान्य उचल करून घ्यावे व त्यानंतर प्राधान्य कुटुंब व अंत्योदय कुटुंब यांनी मोफत तांदुळाचे धान्य उचल करावे. 


अंत्योदय व प्राधान्य कुटुंबातील प्रत्येक लाभार्थ्यांना दर महिन्याला ५ किलो तांदूळ एप्रिल, मे व जून  या तीन महियामध्ये त्‍या, त्‍या महिण्यात मोफत दिल्या जाणार आहे. शिधापत्रिकाधारकांना या नियमित धान्याव्यतिरिक्त हे मोफत धान्य फक्त राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेतील प्राधान्य कुटुंब योजना व अंत्योदय योजनेच्या लाभार्थ्यांनाच देण्यात येणार आहे. शेतकरी योजनेतील लाभार्थ्यांना हा मोफत तांदूळ दिल्या जाणार नाही. सार्वजनिक वितरण प्रणाली अंतर्गत माहे एप्रिल ते जून या तीन महिन्यांत या मोफत तांदळाचा लाभ लाभार्थ्यांना मिळणार आहे. 


हे धान्य प्राप्त होताच स्वस्त धान्य दुकानदारामार्फत वितरित करण्यात येणार आहे. तीन महिन्यांचे धान्य एकदा दिले जाणार नाही. सर्व स्वस्त धान्य दुकाने शासन नियमाप्रमाणे सुरू राहणार आहेत. जास्त दराने पैसे घेणे कमी धान्य देणे, मोफत तांदुळास पैशाची मागणी करणे अशा तक्रारी असल्यास लाभार्थ्यांनी स्वस्त धान्य दुकानदारांची तक्रार संबधीत मंडळ अधिकारी, पुरवठा विभागाकडे करण्याचे आवाहन तहसीलदार ज्योती पवार यांनी केले आहे.
लाभार्थ्यांना नियमित देण्यात येणारे धान्य प्राधान्य कुटूंब योजना व शेतकरी योजना प्रतिव्यक्ती ३ किलो गहू,२ किलो तांदुळ हे २ रुपये व ३ रुपये प्रतिकिलो दराने देण्याच्या सूचनाही करण्यात आल्या आहेत.


Popular posts from this blog

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कृषी अधिकाऱ्याच्या दालनात आंदोलन

काकडदाभा येथे अनेकांचा आमदार बांगर यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश

ओमप्रकाश देवडा बँकेला ३.१५ कोटीचा निव्वळ नफा