जमीनीतून आलेल्या गुढ आवाजाने ग्रामस्थ झाले भयभित
जमीनीतून आलेल्या गुढ आवाजाने ग्रामस्थ झाले भयभित
पांगरा शिंदेसह, सिंदगी, पोतरा, जांब परिसरात भूकंपाचे सौम्य धक्के
हिंगोली - वसमत तालुक्यातील पांगरा शिंदे येथे रविवारी सकाळी 8.10 वाजता जमिनीतून गुढ आवाज येवून जमीन हादरल्याने घरावरील टिनपत्राचे एक ते दिडमिनीट खडखडाट झाला हा हादरी वापटी, कुपटी, सिरळी या गावात जाणवला तसेच कळमनुरी तालुक्यातील सिंदगी, पोतरा, जांब येथे देखील घरावरील टिनपत्राचा खडखडाट झाल्याने ग्रामस्थ भयभित झाले होते.
वसमत तालुक्यातील पांगरा शिंदे येथे मागच्या अनेक वर्षापासून जमीनीतुन गुढ आवाजाची मालीका सुरू आहे. पुर्वी एक वर्ष ते सहा महिण्याला असे आवाज येत असत मात्र मागच्या तीन ते चार वर्षापासून येथे कधी आठ दिवसाला तर कधी पंधरा दिवसाला आवाज येण्याची मालिका सुरू आहे. मागच्या चार ते पाच महिण्यानंतर आज जमीनीतून गुढ आवाज आला आहे. या आवाजाने वसमत तालुक्यातील पांगरा शिंदे गावासह वापटी, कुपटी, सिरळी येथे सकाळी 8.10 मिनीटाला जमीनीतून गुढ आवाज आला त्यामुळे अनेकाच्या घरावरील टिनपत्राचा खडखड असा आवाज आल्याचे संतोष शिंदे, सुदर्शन शिंदे यांनी सांगितले. या आवाजाने ग्रामस्थ घरातून बाहेर निघाले होते. येथे आवाजाची मालिका सुरू असल्याने ग्रामस्थ नेहमीचाच हा प्रकार असल्याचे सांगत आहेत. मात्र कोणतीही हानी झाले नाही. तर पोतरा, सिंदगी येथे आवाज आल्याचे जानकिराम आप्पा रणखांब, दसरथ मुलगीर, बालाजी भुसनर यांनी सांगितले.
तसेच पांगरा शिंदे येथील आवाज आल्यानंतर कळमनुरी तालुक्यातील सिंदगी, जांब, पोतरा या गावात देखील जमीन हादरल्याने टिनत्राचा खडखड असा आवाज आल्याचे गावकरी सांगत आहेत. आवाज येतात घरातील नागरीक बाहेर येवून कोठे काय झाले याची चर्चा करीत होते. येथे देखील कोणतेही नुकसान झालेली नाही मात्र या पांगरा शिंदे येथे आवाज आल्यावर या गावात जमीन हादरण्याचे प्रकार नेहमीच होत आहेत. दरम्यान, पांगरा शिंदे येथील गुढ आवाजा बाबत नांदेड येथील स्वारातीम विद्यापीठातील तज्ञांनी येथे भेट देवून पाहणी केली मात्र आवाजाचे गुढ काही उकलले नाही तसेच जिल्हा आपती व्यवस्थानाला देखील ग्रामस्थांनी वेळोवेळी कळविले आहे.
दरम्यान, या आवाज व जमीनीतील हादऱ्या बाबत जिल्हा आपती व्यवस्थापनाचे व्यवस्थापन अधिकारी रोहीत कंजे यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी सांगितले की आवाज आल्याची किंवा भुकंपाच्या हादऱ्याची तशी कोणतीही नोंद नसल्याचे त्यांनी सांगितले. मात्र पांगरा शिंदेसह या गावात अनेक दिवसापासून सुरू असलेले गुढ आवाज व त्यानंतर जमीन हादरण्याचे प्रकार सुरू असल्याने या बाबत ग्रामस्थाना या आवाजाचे गुढ उकलुन मार्गदर्शन करावे अशी मागणी होत आहे.