हिंगोलीत पाच वर्षीय बालकाला कोरोनाची लागन
हिंगोलीत पाच वर्षीय बालकाला कोरोनाची लागन
कोरोना बाधीतांची संख्या 14 वर पोहचली ,जिल्हा प्रशासनाची धाकधूक वाढली
हिंगोली - जिल्ह्यातील सेनगाव येथील विलगीकरण कक्षात भरती असलेल्या पाच वर्षीय बालकाचा कोरोना तपासणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे .त्यामुळे आता जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या 14 वर पोहचली असून जिल्हा प्रशासनाची धाकधूक वाढली आहे.काही काळ ग्रीनझोन ठरलेला हिंगोली जिल्हा आता रेड झोन च्या मार्गावर असून मराठवाड्यात औरंगाबाद पाठोपाठ दुसऱ्या क्रमांकावर येऊन ठेपला आहे.
हिंगोली जिल्ह्यातील 14 रुग्णांमध्ये 12 जन हे केंद्रीय सुरक्षा बलाचे जवान आहेत. तर आणि एका व्यक्तीसह विलगीकरण कक्षातील पाच वर्षे बालकाला कोरण्याची लागण झाल्याचा अहवाल रात्री उशिरा प्राप्त झाला. हिंगोली जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांची संख्या 14 वर पोहोचली असल्याने हिंगोली जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी नागरिकांनी आपल्या घरातच राहून शासन आणि प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन हिंगोली जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
प्रारंभी जिल्हा प्रशासनाने विविध उपाय योजना हाती घेत जिल्ह्यात कोरोना रोखण्यासाठी आटोकाट प्रयत्न चालविले होते. मात्र( ता.२८)मार्च रोजी मर्कज येथून आलेल्या एका व्यक्तीला कोरोना बाधित असल्याचे आढळून आल्याने त्याचा अहवाल २ फेब्रुवारीला पॉझिटिव्ह आल्याने त्या व्यक्तीला जिल्हा सामान्य रुग्णालयातील आयसोलेशन वॉर्डात १४ दिवस भरती करण्यात आले होते.त्यानंतर त्याचे दोन्ही अहवाल निगेटिव्ह आल्याने त्याला घरी पाठवण्यात आले होते. त्यामुळे हिंगोली जिल्हा औटघटकेपुरता का होईना कोरोना मुक्त झाला होता. त्यानंतर मागील आठवड्यात मालेगाव ,मुंबई येथून बंदोबस्तावरून परतलेले १९४ जवान हिंगोलीत दाखल झाले असता त्यांची तपासणी करून स्वाब नमुने प्रयोग शाळेकडे पाठविले होते. यातील सहा जवानांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पस्ट झाले. त्यानंतर पुन्हा जालना येथून आलेला जवान हिवरा बेलचा राहणार असून त्याचा ही अहवाल पॉझिटिव्ह आला. सोमवारी पुन्हा दोघे पॉझिटिव्ह आल्याने कोरोना बाधितांची संख्या तेरा वर पोहचली होती. मंगळवारी त्यात पुन्हा सेनगाव तालुक्यातील पाच वर्षीय बालकाला कोरोना झाल्याने आता ही संख्या १४ वर पोहचली आहे.
मर्कज कनेक्शन नंतर राज्य राखीव दलाच्या जवानांनी मालेगाव, मुंबई येथे बंदोबस्तावर गेले असताना कोरोना व्यक्तीशी संपर्क आल्याने बारा जवानांचा पहिला अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. आता त्या सर्व जवानांना शासकीय रुगग्णालयात भरती करण्यात आले असून त्यांच्या संपर्कातील इतर ९२ लोकांना देखील क्वारंटाइन केले आहे. याशिवाय हिवरा बेल येथील कोरोना बाधित संपर्कातील व्यक्तींचे स्वाब नमुने प्रयोगशाळेकडे पाठविले असून खानापूर सह हिवरा बेल कन्टेन्टमेन्ट करण्यात आले. असून सोमवारी सायंकाळी एका चालकाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने भिरडा येथील त्यांच्या संपर्कातील नागरिकांना देखील क्वारंटिन करण्यात आले.