हिंगोलीत सहा कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याने जिल्हा प्रशासनाची धाकधूक वाढली
हिंगोलीत सहा कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याने जिल्हा प्रशासनाची धाकधूक वाढली
हिंगोली - दोन दिवसांपूर्वी मुंबई व मालेगाव येथून बंदोबस्ता वरून परतलेल्या १९४ जवानांना क्वारंटाइन करून ,त्या सर्वांचे स्वाब नमुने औरंगाबाद येथील प्रयोग शाळेकडे पाठविले होते. त्याचे नमुने प्राप्त होताच यातील सहा जवानांना कोरोना पॉझिटिव्ह झाल्याचे आवाहाला वरून स्पस्ट झाल्याने जिल्हा प्रशासनाची धाकधूक वाढली आहे.
हिंगोली येथील राज्य राखीव दलाच्या दोन तुकड्या मालेगाव व मुंबई येथे दोन महिन्यांपूर्वी कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी बंदोबस्तावर गेले होते .दरम्यान याच काळात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढल्याने या सर्वांना त्या ठिकाणी ठेवण्यात आले होते. मात्र बंदोबस्ताचा कालावधी पूर्ण झाल्याने यातील दोन्ही तुकड्या परत पाठविण्यात आल्या. यामध्ये मालेगाव ,मुंबई येथे १९३ जवान कर्तव्य बजावण्यासाठी गेले होते .शनिवारी मालेगावची ९१ जवानांची एक तुकडी हिंगोलीत दाखल झाली. तर रविवारी मुंबई येथून १०२ जवानांची तुकडी दाखल झाली होती. या १९३ जवानांची येथील राज्य राखीव बल गटाच्या कार्यालयात १४ दिवस क्वारंटाइन करून त्यांचे स्वाब नमुने औरंगाबाद येथील प्रयोग शाळेत पाठविले होते. या सर्वांचा अहवाल मंगळवारी सामान्य रुग्णालयात प्राप्त होताच १९३ नमुन्यांपैकी सहा जणांचे स्वाब अहवाल पॉझिटिव्ह आढळून आल्याने जिल्हा प्रशासनाची चिंता वाढली आहे.
काही दिवसांपूर्वी दिल्ली मर्कज येथून आलेल्या वसमत येथील एका युवकाला कोरोनाची साम्य लक्षणे दिसून आल्याने त्याला रुग्णालयातील आयसोलेशन वॉर्डात भरती केले होते. परंतु त्याचे स्वाब नमुने अहवाल पाझिटिव्ह आल्याने जिल्हा प्रशासन चांगलेच हादरले होते. त्या रुग्णाला व्यवस्थित उपचार मिळाल्याने तो रुग्ण१४ दिवसानंतर ठणठणीत बरा होऊन घरी गेला. जिल्हा रुग्णालयातील डॉक्टर, नर्स यांच्या अथक परिश्रमाने बऱ्या झालेल्या रुग्णाचे स्वागत करून घरी पाठवले असताना प्रशासनाने सुटकेचा श्वास मोकळा सोडला होता. तीन दिवसापूर्वी बरा होऊन गेलेला रुग्ण घरी परतताच पुन्हा मंगळवारी राज्य राखीव दलातील सहा जवानांना कोरोना पॉझिटिव्ह झाल्याचे आढळून आल्याने जिल्हा प्रशासनासह आरोग्य विभागाची डोकेदुखी वाढली आहे. आधीच जिल्हा कोरोनामुक्त झाला होता.ऑरेंज झोन मधून ग्रीन झोन कडे वाटचाल करीत असताना मात्र राज्य राखीव जवानांच्या बंदोबस्तावर गेलेल्या सहा जवानांना कोरोनाची लागण झाली असल्याचे अहवाल अंती स्पस्ट झाले आहे. आता जिल्हा प्रशासनाला कडक भूमिका घ्यावी लागेल तरच कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यास मदत मिळेल.