'त्या' उपविभागीय अधिकाऱ्याला निलंबित करावे
'त्या' उपविभागीय अधिकाऱ्याला निलंबित करावे
आ.अभिमन्यु पवार यांच्या विनंतीवरून देवेंद्र फडणवीस यांची हरियाणाच्या मुख्यमंत्र्यांकडे मागणी
लातूर जिल्ह्य़ातील जनतेने
न घाबरण्याचे आवाहन
औसा/ प्रतिनिधी: देशात आणि राज्यात कोरोनाचा लॉक डाऊन असताना हरियाणा राज्यातील फिरोजपुर जिरका येथील उपविभागीय अधिकाऱ्याच्या परवानगीने कोरोना बाधितांनी प्रवास केला. अशा पद्धतीने एका उपविभागीय अधिकाऱ्याला परवानगी देता येते का ?असा प्रश्न उपस्थित करून त्या अधिकाऱ्याला निलंबित करावे अशी विनंती आ. अभिमन्यू पवार यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे केली होती या विनंतीवरून फडणवीस यांनी हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांच्याशी संपर्क साधत याप्रकरणी संबंधित उपविभागीय अधिकारी यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली असून याबाबत कारवाईचे आश्वासन मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांनी दिल्याची माहिती आ. अभिमन्यू पवार यांनी दिली. रुग्ण सापडले असले तरी जिल्ह्यातील जनतेने घाबरून जाऊ नये असे आवाहनही त्यांनी केले आहे .
कोरोना या आजाराच्या पार्श्वभूमीवर प्रशासन योग्य पद्धतीने काम करत आहे .या आजाराचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अत्यावश्यक सर्व सुविधा आपल्याकडे उपलब्ध आहेत . निलंगा येथे ८ जण कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यामुळे जनतेमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे .या पार्श्वभूमीवर जनतेला धीर देताना आ.पवार म्हणाले की ,रुग्ण निलंगा येथे सापडले असले तरी ते आपल्या जिल्ह्यातील नाहीत. ते सर्वजण प्रवासी असून ते हरियाणा राज्यातून कर्नूल जिल्ह्यातील आपल्या गावाकडे जात होते .निलंगा येथे ते आढळले . त्यांची तपासणी केली असता त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे आढळले .मानवतेच्या भुमिकेतून आता त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
एका उपविभागीय अधिकाऱ्याला अनेक राज्यातून प्रवास करण्यासाठी परवानगी देता येते का हा खरा प्रश्न आहे. त्या अधिकाऱ्याने कोणत्या अधिकारात परवानगी दिली ? अनेक राज्य आणि जिल्ह्याच्या सीमा ओलांडून हे व्यक्ती इथपर्यंत कसे आले ?त्यांची प्रवासात चौकशी का झाली नाही ? असे प्रश्न आ. पवार यांनी उपस्थित केले आहेत . याबाबत आ. अभिमन्यू पवार यांनी माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे विनंतीकरुन या संपूर्ण प्रकाराची चौकशी करून फिरोजपुर जिरका येथील उपविभागीय अधिकारी यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्याची मागणी केली असून याबाबत देवेंद्र फडणवीस यांनी
हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांच्याशी संपर्क साधत याप्रकरणी संबंधित फिरोजपुर झिरगा येथील उपविभागीय अधिकारी यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. याप्रकरणी मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांनी संबंधितावर कारवाईचे आश्वासन दिल्याची माहिती आ. अभिमन्यू पवार यांनी सांगितले आहे.रुग्ण सापडण्यापूर्वी आणि नंतरही जिल्ह्यातील सर्व यंत्रणा अद्ययावत आहे.आजच आपण मुख्यमंत्र्यांचे मुख्य सचिव विकास खारगे,पालकमंत्री अमित देशमुख , जिल्हाधिकारी जी. श्रीकांत, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.गिरीश ठाकूर , जिल्हा पोलीस अधीक्षक राजेंद्र माने,जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय ढगे , जिल्हा आरोग्य अधिकारी गंगाधर परगे यांच्याशी चर्चा केली जिल्ह्य़ातील सर्व यंत्रणा सज्ज व अद्ययावत असून शासकीय व खाजगी रुग्णालयात ७० व्हेंटिलेटर उपलब्ध आहेत. ट्रिपल लेयरचे एन - ९५ मास्क ,पीपीई किट ( पर्सनल प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंट )आणि औषधी पुरेशा प्रमाणात जिल्ह्यात उपलब्ध आहेत. यामुळे जनतेने घाबरण्याची गरज नाही .
नागरिकांच्या आरोग्याबाबत माहिती घेतली. त्यांच्याकडून माहिती घेतली. जिल्ह्याला सर्व प्रकारच्या औषधांचा पुरेसा साठा उपलब्ध आहे .महसूल ,आरोग्य, पोलीस यासह सर्वच प्रशासकीय यंत्रणा योग्य पद्धतीने कार्यरत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निर्देशानुसार योग्य पद्धतीने काम सुरू असल्याची माहिती आ.पवार यांनी दिली .संबंधित उपचार घेत असलेले कोरोना बाधीत रुग्णांवर योग्य उपचार सुरू असून उपचारार्थ ते बरे होतील अशी अपेक्षाही यावेळी त्यांनी व्यक्त केली.