पॉझिटिव्ह कोरोना व्यक्तीचा अहवाल निगेटिव्ह आल्याने जिल्हा कोरोनामुक्त टाळ्यांच्या गजरात व्यक्तीचे स्वागत करून घरी पाठवले
पॉझिटिव्ह कोरोना व्यक्तीचा अहवाल निगेटिव्ह आल्याने जिल्हा कोरोनामुक्त
टाळ्यांच्या गजरात व्यक्तीचे स्वागत करून घरी पाठवले
हिंगोली - येथील सामान्य रुग्णालयात पंधरादिवसापूर्वी संशयित कोरोना व्यक्तीला आयसोलेशन वॉर्डात उपचारासाठी दाखल केले होते. त्याचा अहवाल दोन एप्रिलला औरंगाबाद येथील प्रयोग शाळेकडून प्राप्त होताच तो पॉझिटिव्ह निघाल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली होती. मात्र त्याचे दोन्ही थ्रोट स्वाब नमुने निगेटिव्ह आल्याने जिल्हा कोरोनामुक्त कडे वाटचाल करीत आहे. शुक्रवारी त्याच्या चाचण्या घेऊन पंधरा दिवसाचा कालावधी संपल्याने त्या व्यक्तीस त्याचा हौसला बुलंद करण्यासाठी रुग्णालयातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी त्याचे टाळ्यांच्या गजरात स्वागत करीत घरी पाठवले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रसाद कुमार श्रीवास यांनी दिली.
येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात कोरोना संशयित रुग्णासाठी स्वतंत्र कक्ष स्थापन करण्यात आला असून यामध्ये व्हेंटिलेटर सह आठ बेडची व्यवस्था करण्यात आली आहे. जिल्ह्यात कोरोनाचा प्रसार होऊ नये ,जिल्हा कोरोना मुक्त करण्यासाठी जिल्हा प्रशाशन, आरोग्य विभाग, महसूल विभागाने कंबर कसली असून विविध उपाय योजना केल्या आहेत. कोरोना विषाणूची साखळी तोडण्यासाठी जिल्ह्यात लॉकडाऊन, संचारबंदी करण्यात आली आहे. नागरिकांना घरीच सुरक्षित राहण्याचे आवाहन करीत विनाकारण बाहेर फिरू नये ,घरपोच किराणा, मेडिकल ची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.तरी देखील काही नागरिक रस्त्यावर येत आहेत, यांना कोणतेही गांभीर्य नाही ,प्रशासन सांगून देखील स्वतःचे व कुटूंबाची काळजी घेत नाहीत.
दिल्ली मर्कज येथे एका तब्लिकी कार्यक्रमाला गेलेल्या नागरिकांत जिल्ह्याचे बारा जण गेले होते. परत एकटाच आला तर बाकिच्या नागरिकांना इंदोर येथे ठेवण्यात आले. मर्कज हुन परत आलेल्या एका व्यक्तीला कोरोनासी साम्य लक्षणे दिसून आल्याने त्यास वसमत येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र उपचार करून पुन्हा सामान्य रुग्णालयात ३१ मार्च ला भरती करण्यात आले. त्यानंतर त्या (४९) वर्षीय कोरोना संशयित व्यक्तीचे थ्रोट नमुने औरंगाबाद येथील प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आले. दोन एप्रिलला त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर यंत्रणा खडबडून जागी झाली.त्यानंतर जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली केंद्रीय आरोग्य कुटुंब कल्याण यांच्या सुचनेनूसार कोरोना ग्रस्त व्यक्ती वसमत येथे ज्या ठिकाणी राहत होता त्या परिसरात कंटेनंट झोन, बफर झोनची प्रक्रिया राबविण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
पुढे डॉ. श्रीवास म्हणाले, जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी ,पोलीस अधीक्षक योगेशकुमार, एसडीएम प्रवीण फुलारी, तालुका वैद्यकीय अधिकारी, वैद्यकीय अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली ६१ पथके तयार केली आणि घरोघरी जाऊन त्या परिसरात १४दिवस सर्व्हेक्षण करण्यात आले असल्याचे सांगून सर्दी, खोकला,श्वासाला त्रास होत असलेल्या त्यांच्या संपर्कातील चौदा लोकांची तपासणी करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.तयानंतर१४ दिवसाच्या क्वारं टाइन नंतर त्याची प्रकृर्ती ठणठणीत असल्याने शिवाय त्याचे दोन्ही थ्रोट नमुने निगेटिव्ह आल्याने जिल्हा प्रशासनाने त्या कोरोना रुग्णास सुट्टी देण्यात आल्याचे शेवटी सांगितले.