दानशुर व्यक्तीकडून मिळालेल्या मदतीचे गरजुना वाटप हिंगोली नगरपरिषदेचा पुढाकार
हिंगोली - कोरोनाच्या पार्श्वभुमीवर शहरात कोणताही गरजु उपाशी राहणार नाही याची काळजी घेत नगरपालिका प्रशासनाने दानशुरांना मदतीचे आवाहन केल्यानंतर मदत संकलन केंद्राकडे दररोज मोठ्या प्रमाणार मदत येत असून ती मदत गरजुपर्यत पोहचविण्याचे काम पालिका प्रशासन करीत असल्याची माहिती मुख्याधिकारी रामदास पाटील यांनी दिली आहे.
कोरोनामुळे सुरू असलेल्या लॉकडानमुळे मजुरांच्या हाताला काम नसल्याने ते अडचणी सापडले आहेत. तसेच शहरात परप्रांतीय नागरीक देखील सीमाबंदीमुळे अडकून पडल्याने त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला होता. त्यांना लोकप्रतिनिधी विविध संस्था, मंडळाने मदत देणे सुरू केले होते मात्र नियमित मदत देण्यासाठी आणखी गरज भासू लागल्याने नगरपालिकेचे मुख्याधीकारी रामदास पाटील यांनी शहरातील दानशुर व्यक्तींना तसे आवाहन केले होते त्यानंतर पालिकेतर्फे मदत संकलन केंद्र सुरू करून पालिकेचे कर्मचारी घरपोच जावून मदत स्विकारत आहेत.
त्याप्रमाणे जमा झालेली मदत गरजुपर्यत पोहचविण्याचे काम पालिका प्रशासनाने सुरू केले आहे. दरम्यान बुधवारी (ता.15) दानशुर व्यक्ती, सामाजिक संस्था यांच्याकडून प्राप्त झालेली मदत शहरातील दिव्यांग, आशा, सफाई कर्मचारी या गरजुना वाटप करण्यात आली यात
302 दिव्यांगाना प्रत्येकी पाच किलोप्रमाणे आटा, गहू, तांदूळ तर एक किलो डाळ, एक लिटर तेल, एक साबण, एक हँडवॉश, एक सॅनिटायझर, एक मास्कचे वाटप करण्यात आले आहे. तसेच 32 एचआयव्ही ग्रस्तांना दहा किलो आटा, पाच किलो तांदूळ, दोन किलो डाळ, एक लिटर तेल, साबण एक, हँडवॉश एक, सॅनिटायझर एक व मास्क देण्यात आले. 188 सफाई कर्मचारी आणि स्वछता कामगारांना प्रत्येकी पाच किलो गहू, तांदूळ, एक किलो डाळ, एक लिटर तेल, मीठ पुडा एक, मिरची पावडर पुडा एक, साबण एक चे वाटप करण्यात आले.
15 आशा हेल्थवर्कर यांना प्रत्येकी गहू व तांदुळ पाच किलो, डाळ एक किलो, एक लिटर तेल, मीठ पुडा एक, मिरची पावडर एक, साबण एक वाटप केले तर 24 वयोवृध्दांना प्रत्येकी आटा, तांदूळ पाच किलो, डाळ एक किलो तसेच 10 रोजंदारी कामगारांना प्रत्येकी गहू, तांदूळ पाच किलो, डाळ एक किलो, तेल एक लिटर या प्रमाणे
एकूण वाटप धान्य सामग्रीत 571 किट 571 गरजुना वाटप केले आहे. तसेच बाहेर राज्यांतील अडकून पडलेल्या गरजूना गहू 130 किलो, आटा 130 किलो, तांदूळ 865 किलो, तूरडाळ 141, चणाडाळ 52 किलो, तेल 94 लिटर प्रमाणे वाटप केल्याची माहिती मुख्याधीकारी पाटील यांनी दिली.