हिंगोलीत आणखी चार जवानांना कोरोनाची लाग

हिंगोलीत आणखी चार जवानांना कोरोनाची लाग


कोरोना रुग्ण संख्येत वाढ ,एकूण अकरा जनावर उपचार सुरू


हिंगोली : मालेगाव येथील बंदोबस्तावरून परतलेल्या क्वारंटाइन मध्ये ठेवण्यात आलेल्या चार एसआरपीएफच्या जवानांना कोरोना विषाणूची लागण झाल्याचा अहवाल औरंगाबाद येथील शासकीय महाविद्यालयातून जिल्हा सामान्य रुग्णालयात सोमवारी ( ता.२७) प्राप्त झाला असून चार जवानांना कोरोनाची लागण झाल्याने आता रुग्ण संख्येत वाढ होऊन आकारावर पोहचली आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाची धाकधूक वाढली आहे.


मागील आठवड्यात मालेगाव, मुंबई येथून १९२ जवान कर्तव्य पार पाडून हिंगोलीत परतले होते.याची माहिती जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांना मिळताच त्यांनी तातडीने एसआरपीएफ मधील रुग्णालयात सर्व जवानांना कोरंटाइन करून त्यांच्या आरोग्याची तपासणी करून त्याचे स्वाब नमुने औरंगाबाद येथील शासकीय महाविद्यालयकडे पाठविण्यात आले होते. यातील१९४ जवानापैकी सहा जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने एकच खळबळ उडाली होती. मात्र पॉझिटिव्ह निघालेल्या व सोबतच्या जवानांवर उपचार करून कोरंटाईन करताच न करताच तोच पुन्हा जालना येथून हिंगोलीत दाखल झालेल्या हिवरा बेल येथील एका जवानाला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले. जिल्ह्यात कोरोना बाधितांचा आकडा सात वर गेला असताना यांच्या संपर्कातील चार जवानांचा अहवाल पुन्हा पॉझिटीव्ह आल्याने आता कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाची संख्या आकारावर पोहचली आहे.


या चार जवानांना एसआरपीएफ अंतर्गत तयार करण्यात आलेल्या 
क्वारंटाइन सेंटर मध्ये ठेवण्यात आले होते. या सर्व जवानांचा पहिला तपासणी अहवाल निगेटिव्ह आला होता. तर यापैकी तीन जवानांना  ता.२३एप्रिल रोजी ताप, सर्दी खोकला आल्यामुळे जिल्हा सामान्य रुग्णालयातील आयसोलेशन वॉर्डात भरती केले होते. एका जवानाला पुन्हा शुक्रवारी आयसोलेशन वॉर्डात भरती करून उपचार सुरु होते.त्यानंतर या चार जवानांचे थ्रोट स्वाब अहवाल (ता.२५) रोजी घेण्यात आले होते. त्यांचा अहवाल सोमवारी प्राप्त झाला असून चार जवान पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. कुमार प्रसाद श्रीवास यांनी दिली. या सर्वांची प्रकृती स्थिर असून कुठल्याही प्रकारची गंभीर लक्षणे नसल्याचे त्यांनी सांगितले. येथील जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या आयसोलेशन वॉर्डात कोरोना बाधित दहा जवान आणि जालना येथील एक असे एकूण अकरा कोरोना बाधितांची संख्या झाली आहे.


जवानाची प्रकृती स्थिर
--------------------------
चार जवानांच्या स्वॅब नमुन्याचा अहवाल औरंगाबाद येथील प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आला होता. सोमवारी त्याच्या स्वॅब नमुन्याचा अहवाल प्राप्त झाला असून तो कोरोना पॉझिटिव्ह आला असल्याचे जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. किशोरप्रसाद श्रीवास यांनी सांगितले. जवानाची प्रकृती स्थिर असून कुठल्याही प्रकारची गंभीर लक्षणे नाहीत. 


कोरोनाबाधितांची संख्या आकारावर पोहचली
-------------------------------------------- प्रशासनाने कोरोना बाधित जवानाच्या संपर्कात आलेल्या ४६ जणांनाही रुग्णालयात क्वारंटाइन केले आहे. जिल्ह्यात आढळलेला पहिला कोरोनाबाधित रुग्ण ठणठणीत होऊन घरी परतला असतानाच पुन्हा सात जवान कोरोना बाधित आढळले. आता त्यात आणखी चार जवानाची भर पडली असून एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आकारावर पोहचली आहे.


Popular posts from this blog

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कृषी अधिकाऱ्याच्या दालनात आंदोलन

काकडदाभा येथे अनेकांचा आमदार बांगर यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश

ओमप्रकाश देवडा बँकेला ३.१५ कोटीचा निव्वळ नफा