कलेक्टर जयवंशी यांच्याकडून मुस्लिम बांधवांना रमजानच्या शुभेच्छा 

कलेक्टर जयवंशी यांच्याकडून मुस्लिम बांधवांना रमजानच्या शुभेच्छा 


 मात्र घरातच राहून नमाज अदा करण्याच्या  दिल्या सूचना


हिंगोली -  मुस्लिम बांधवांचा पवित्र रमजान महिना शनिवार (ता.२५) पासून सुरू झाला असून पवित्र रमजान निमित्त मुस्लिम बांधवांना जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी रमजान मुबारक अशा शब्दात त्यांनी शुभेच्छा देत रमजानच्या काळात मुस्लिम बांधवांनी आपआपल्या घरातच राहून नमाज अदा करण्याच्या सूचना मुस्लिम समाज बांधवाना दिल्या आहेत.तसेच कोरोना संसर्ग रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन त्यांनी केले आहे.


जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी संपूर्ण जिल्हाभरात लॉकडाऊन सुरु आहे. शिवाय कलम 144 लागू असल्याने संचारबंदीचे आदेश आहेत .अशा परिस्थितीत मुस्लिम बांधवांचा पवित्र रमजान महिना सुरू असल्याने या काळात रमजान साजरा करणाऱ्या मुस्लिम बांधवांना सायंकाळी इफ्तार पार्टी देण्याची परंपरा आहे. सायंकाळची नमाज झाल्यानंतर मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने एकत्र येत असतात मात्र सध्या कोरोना संसर्ग रोखण्यासाठी देशभरासह हिंगोली जिल्ह्यातही लॉकडाऊन आणि संचारबंदी सुरू आहे. या काळामध्ये मुस्लिम बांधवांनी रमजान निमित्त आपापल्या घरातच राहून नमाज अदा करावी. सामाजिक अंतराचे भान ठेवत घरातच धार्मिक कार्यक्रम साजरे करावेत असे आवाहनही जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.


 लॉकडाऊन काळात सर्व धार्मिक सण, उत्सवावर बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी कोणीही गर्दी करू नये अशा सूचना यापूर्वीच जिल्हाधिकारी रुचेश 
जयवंशी यांनी दिल्या आहेत.जिल्ह्यात आज घडीला सात कोरोना बाधित रुग्ण आढळून आल्याने जिल्हा प्रशासनाने कोरोना रुग्णांना निगेटिव्ह करण्यासाठी आरोग्य यंत्रणा सर्व ताकदीनिशी कामाला लागली आहे. शिवाय कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विविध उपाय योजना करीत आहे. मात्र काही लोक गांभीर्य लक्षात घेत नसून विनाकारण रस्त्यावर येऊन जिल्हा प्रशासनाच्या नियमांचे उल्लंघन करीत आहेत. उल्लंघन करणाऱ्या लोकांना पोलीस विभागाकडून दुचाकी जप्त करून दंड वसूल करीत आहेत. आता सात रुग्ण आढळून आल्याने संचारबंदीच्या काळात शिथिलता न देता प्रशासनाने कडक धोरण राबविण्याची गरज आहे. तरच कोरोनाचा संसर्ग रोखण्यास मदत मिळेल.


Popular posts from this blog

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कृषी अधिकाऱ्याच्या दालनात आंदोलन

काकडदाभा येथे अनेकांचा आमदार बांगर यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश

ओमप्रकाश देवडा बँकेला ३.१५ कोटीचा निव्वळ नफा