रास्तभाव दुकानदार संघटनेचे पुरवठा विभागाकडे निवेदन
रास्तभाव दुकानदार संघटनेचे पुरवठा विभागाकडे निवेदन
हिंगोली - कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सुरू असलेल्या लॉकडाऊमुळे गरीब कल्याण योजनेतंर्गत टप्याटप्याने तीन महिण्याचे मोफत धान्य वाटपा बाबत स्वस्तधान्य दुकानदार संघटनेने जिल्हा पुरवठा अधिकारी अरुणा संगेवार यांच्याकडे निवेदन सादर केले आहे.
या बाबत संघटनेचे अध्यक्ष भिकुलाल बाहेती, सचिव आशेक काळे, फारूख पठाण, नवनाथ कानबाळे यांनी निवेदन दिले आहे की, अंत्योदय व इतर योजनेतील लाभार्थ्याना मोफत धान्य वाटप करण्याचे आदेश काढले आहेत. त्याचे दुकानदारांना कोणतेही कमीशन नाही त्यामुळे धान्याच्या गोदामापासून स्वस्तधान्याच्या भावाची चढाई व उतराई करण्याची हमाली शासकिय कंत्राटदाराच्या करारात नमुद आहेत. त्यामुळे त्यांनीच ती अदा करावी मात्र ट्रकसोबत हमाल पाठविले जात नसल्याने त्याचा खर्च दुकानदारांनाच करावा लागत आहे.
यात कंत्राटदाराने दुकानात धान्याची थप्पी मारून वजन करून देण्यास आदेशीत करावे तसेच राशनकार्डावर जास्त नावे आहेत तर मशीनवर तेवढी नावे नाहीत परंतू कार्डधारक कार्डावरील संख्येवरून धान्याची मागणी करीत आहेत. मात्र मशीनमध्ये असलेल्या नावाप्रमाणेच पावती निघत आहे. लाभार्थ्याना पावतीप्रमाणे धान्य दिले तरी देखील तक्रार केल्या जात आहेत. एपीएल कार्डधारकाचे फिडींग झालेले नाही त्या बाबत देखील तक्रारी केल्या जात आहेत. या बाबत योग्य निर्णय घेण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.