रामनवमीचा कार्यक्रम घरीच साजरा करा

रामनवमीचा कार्यक्रम घरीच साजरा करा


हिंगोली -  येथील खाकीबाबा मठात दरवर्षी रामनवमीचा कार्यक्रम मोठ्या उत्‍साहात साजरा केला जातो. परंतू यावर्षी कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी संचारबंदी व जमावबंदी जिल्‍ह्‍यात लागू असल्याने गुरूवारी (ता.२) रामनवमीचा कार्यक्रम भक्‍तांनी मठात न येता घरीच साजरा करावा असे आवाहन महंत कौशल्यादास महाराज यांनी भावीकांना केले आहे. 


शहरातून जाणाऱ्या औंढा नागनाथ रस्‍त्‍यावर कयाधू नदीच्या काठावर साडेतीनशे वर्षापुर्वीचा खाकीबाबा मठ आहे. या मठात राममंदिर असून येथे दरवर्षी रामनवमीचा कार्यक्रम मोठ्या उत्‍साहात साजरा केला जातो. त्‍यानंतर महाप्रसादाचे देखील वाटप केले जाते या कार्यक्रमात मोठ्या संख्येने भावीक सहभागी होता. दरम्‍यान, गुरूवारी रामनवमी आहे परंतू यावर्षी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संचारबंदी व जमावबंदी असल्याने खाकीबाबा मठात होणारा कार्यक्रम यावर्षी होणार नाही. 


त्‍यामुळे भावीकांनी येथे येण्याचे टाळावे रामनवमीचा कार्यक्रम सायंकाळी साडेसात वाजता अंगणात दिवे लावून आप आपल्या घरीच साजरा करावा. कोणीही घराच्या बाहेर निघू नये कोरोनाची साखळी तोडण्यासाठी हे गरजेचे आहे. त्‍यासाठी सर्व भक्‍तांनी आपल्या घरीच हा कार्यक्रम करावा असे आवाहन खाकीबाबा मठाचे महंत कौशल्यासदास महाराज यांनी भावीकांना केले आहे. तसेच याची माहिती व्हॉटअसपच्या माध्यमातून देखील दिली आहे.


Popular posts from this blog

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कृषी अधिकाऱ्याच्या दालनात आंदोलन

काकडदाभा येथे अनेकांचा आमदार बांगर यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश

ओमप्रकाश देवडा बँकेला ३.१५ कोटीचा निव्वळ नफा