दोघांचे अहवाल प्रलंबीत तर कोरोना ग्रस्ताचा अहवाल निगेटिव्ह
हिंगोली - येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केलेल्या कोरोना ग्रस्ताचा अहवाल निगेटिव्ह आल्याने जिल्हा प्रशासनाने सुटकेचा निश्वास सोडला आहे.
बुधवारपर्यत दाखल असलेल्या आयसोलेशन वार्डात एकूण ४३ रुग्णांना उपचारासाठी भरती केले होते. तर कोवीड-19 पॉझीटीव्ह आलेल्या रुग्णांची संख्या १, तसेच (ता.१५) एप्रील रोजी दाखल झालेल्या रुग्णाचा आज १४ दिवसाच्या उपचारानंतर पहिला थ्रोट स्वॅब नमुना तपासणी अहवाल निगेटीव्ह आला आहे. कोवीड-19 निगेटीव्ह आलेल्या ४३ रुग्णांची संख्या आहे, आयसोलेशन वार्डातून ४२ संशयित रुग्णांना होम क्वारांटाइन ठेवले आहे. तसेच वसमत येथील शासकिय क्वांरटाईन सेंटर बारा जणांना ठेवण्यात आले आहे. शासकिय क्वांरटाईन सेंटर मध्ये असलेल्या व रिपार्ट प्रलंबीत असलेल्या रुग्णांची संख्या २ असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. किशोरप्रसाद श्रीवास यांनी दिली.