बँकेतील गर्दी टाळण्यासाठी दोन मिटरचे अंतर ठेवा जिल्‍हाधिकारी रुचेश जयवंशी यांचे अग्रणी बँकेच्या व्यवस्‍थापकास पत्र 

बँकेतील गर्दी टाळण्यासाठी दोन मिटरचे अंतर ठेवा


जिल्‍हाधिकारी रुचेश जयवंशी यांचे अग्रणी बँकेच्या व्यवस्‍थापकास पत्र 


हिंगोली - कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी बँकेत होणाऱ्या गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी ग्राहकात दोन मिटरचे अंतर ठेवावे यासाठी त्याप्रमाणे गोल चौकोन आखण्यात यावेत असे पत्राद्वारे  जिल्‍हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी जिल्‍हा अग्रणी बँकेचे व्यवस्‍थापक यांना बुधवारी आदेश दिले आहेत. 


राज्य शासनाच्या आरोग्य मंत्रालयाने जाहीर केल्याप्रमाणे कोरोनाग्रस्‍ताच्या संपर्कात लोकांनी येवू नये तसेच सार्वजनिक किंवा खाजगी जागेत पाच किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्‍तीने एकत्र येणे, थांबणे, चर्चा करणे काही कार्यक्रमाचे आयोजन केल्यास या विषाणूचा संसर्ग व प्रादूर्भाव पसरण्याची शक्‍यता लक्षात घेता सर्व सामान्य जनतेस व त्‍याचे आरोग्यास धोकादायक ठरत आहे. त्‍यामुळे तात्‍काळ प्रतिबंधात्‍मक उपाय करणे आवश्यक आहे. 


विविध योजनेच्या लाभार्थ्याची पैसे काढण्यासाठी बँकेत गर्दी होत असून सोशल डिस्‍टन्सचा भंग होत असल्याच्या तक्रारी येत आहेत. त्‍यामुळे बँकेतील गर्दी टाळण्यासाठी सर्व शाखा व्यवस्‍थापकांना नियोजन करून त्‍यांची अमंलबजावणी करण्याच्या सुचना द्याव्यात यात गर्दी टाळण्यासाठी एक ते दोन मिटरचे अंतरावर गोल चौकोन आखावेत, खातेदार आखलेल्या गोल चौकोनात उभे राहतील याचे नियोजन करावे, खातेदांराना टोकन  देऊन त्‍यानुसार व्यवहार करावेत, उन्हाळा सुरू असल्याने रिकाम्या जागेत मंडप, शामीयाना उभारण्यात यावा, पिण्याच्या पाण्याची व्यवस्‍था करावी, खातेदार, सुरक्षा रक्षक, बँक कर्मचारी व अधिकारी यांच्या सुरक्षेसाठी मास्‍क व सॅनिटायझरचा वापर करण्याचे सर्व संबधितांना सांगावे व त्‍याचे पालन होईल याची दक्षता घ्यावी. या सर्व सुचनाची अमंबजावणी करून तसा अहवाल कार्यालयास सादर करावा हयगय अथवा टाळाटाळ झाल्यास आपल्या विरुध्द कायदेशीर कारवाई करण्यात येईल अशा संबंधीतचे पत्र जिल्‍हा अग्रणी बँकेच्या व्यवस्‍थापकास जिल्‍हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी दिले आहे.


Popular posts from this blog

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कृषी अधिकाऱ्याच्या दालनात आंदोलन

काकडदाभा येथे अनेकांचा आमदार बांगर यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश

ओमप्रकाश देवडा बँकेला ३.१५ कोटीचा निव्वळ नफा