जैन संघटनेद्वारे डॉक्टर आपल्या दारी उपक्रम
जैन संघटनेद्वारे डॉक्टर आपल्या दारी उपक्रम
तपासणीसह मोफत औषधी वितरण
परभणी,प्रतिनिधी
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर येथील भारतीय जैन संघटना व पी.डी.जैन होमिओपॅथिक महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने डॉक्टर आपल्या दारी हा उपक्रम रविवारी(दि.26) अक्षय्य तृतीयेचे मुहुर्तावर सुरू करण्यात आला. यातून विनामूल्य तपासणी व मोफत औषधी वितरण केली जाणार आहे.
रविवारी येथील संत गाडगेबाबा नगरात यानिमित्ताने छोटाखानी कार्यक्रम आयोजीत करण्यात आला होता. त्याद्वारे तेथील नागरिकांची आरोग्य तपासणी व मोफत औषधी वितरीत करण्यात आल्या. हा उपक्रम परभणीतील विविध ठिकाणी पुढील 15 दिवस करण्यात येणार आहे. या कार्यक्रमात परिसरातील 200 पेक्षा अधिक नागरिकांची प्राथमिक मोफत आरोग्य तपासणी व औषधी तज्ञाद्वारे देण्यात आली.
कार्यक्रमासाठी डॉ.केदार कटिंग, डॉ. रामेश्वर नाईक, डॉ. सागर मोरे डॉ सुहास विभुते उपस्थित होते. पी.डी. जैन होमिओपॅथिक महाविद्यालयातून या कार्यक्रमासाठी मोफत अॅम्बुलन्स व कर्मचारीवृंद उपस्थित होते.नगरसेवक सचिन देशमुख,चंद्रकांत शिंदे, रितेश जैन, यांनी कार्यक्रमाच्या यशस्वी होण्यासाठी विशेष मदत केली. या कार्यक्रमासाठी भारतीय जैन संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष झुंबरलाल मुथा जिल्हाधक्ष नीरज पारख, जिल्हासचिव रोहित गंगवाल, शहराध्यक्ष निखिल जैन,पवन झांजरी,मुकेश जैन,राहुल संघवी,उदयराज जैन यांनी पुढाकारा घेतला. कार्यक्रमाची यशस्वीता पाहून आनंद वसंतराव सेवलकर जैन यांनी स्वयंस्फुर्ती ने 10 हजाराता धनादेश जैन संघटनेकड़े औषधी साठी सुपुर्द केला