हरियाणातून दिलेल्या पास प्रकरणी अखेर गुन्हा दाखल









 

आ. अभिमन्यू पवार यांचा पाठपुरावा यशस्वी

 

 औसा /प्रतिनिधी:हरियाणातून आंध्रप्रदेशकडे जाणाऱ्या प्रवाशांना पास उपलब्ध करून दिल्या प्रकरणी अखेर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रवाशांपैकी ८ जण कोरोना बाधित असल्याचे उघड झाल्यानंतर याप्रकरणाची चौकशी करण्यासाठी आ.अभिमन्यू पवार यांनी पाठपुरावा केला होता. तो यशस्वी झाला असून या प्रकरणाची चौकशी केली जात आहे .

 हरियाणातील झिरका या उप विभागातून १२ प्रवासी आंध्रप्रदेशकडे जाण्यासाठी निघाले होते .या प्रवाशांकडे तेथील उपविभागीय अधिकाऱ्यांनी दिलेला पास होता.त्या आधारावर प्रवास करत हे प्रवासी निलंगा येथे पोहोचले. तेथे त्यांना ताब्यात घेऊन वैद्यकीय तपासणी केली असता  १२पैकी ८ जण कोरोना बाधित असल्याचे उघड झाले होते. त्यानंतर याप्रकरणी पास देणाऱ्या त्या  उपविभागीय अधिकाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी आ.अभिमन्यू पवार यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांच्याकडे केली होती .या मागणीची दखल घेत या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यात आली. या प्रवाशांना घेऊन हरियाणातील एका पंचायत समितीचा माजी सभापती उपविभागीय अधिकाऱ्यांकडे आला होता. तेलंगणातील या १२ जणांपैकी एकाची पत्नी रुग्णालयात असून वैद्यकीय कारणास्तव त्यांना पास उपलब्ध करून द्यावा अशी विनंती त्याने केली होती .परंतु हे करत असताना हे सर्व प्रवासी दिल्लीला मरकज येथे जाऊन आल्याचे त्या व्यक्तीने लपवले होते. ते नंतरच्या तपासात उघड झाले. तपासात निष्पन्न झालेल्या बाबीनुसार संबंधित उपविभागीय अधिकाऱ्यांनी नुह जिल्ह्यात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून याप्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

 या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून आ. अभिमन्यू पवार यांनी आवाज उठवला होता. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या माध्यमातून हरियाणाच्या मुख्यमंत्र्यांकडे कारवाई करण्याची मागणी केली होती .आ. अभिमन्यू पवार यांचा पाठपुरावा यशस्वी झाला असून त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू झाली आहे.


 

 



 



 



Popular posts from this blog

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कृषी अधिकाऱ्याच्या दालनात आंदोलन

काकडदाभा येथे अनेकांचा आमदार बांगर यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश

ओमप्रकाश देवडा बँकेला ३.१५ कोटीचा निव्वळ नफा