नर्सी येथे सोशल डिस्टनसिंगचा फज्जा

नर्सी येथे सोशल डिस्टनसिंगचा फज्जा

 

नर्सी नामदेव -  हिंगोली तालुक्यातील नर्सी नामदेव या ठिकाणी ग्रामस्थ सोशल डिस्टन्स पाळत नसल्याचे गुरुवारी  येथील महाराष्ट्र ग्रामीण बँक समोर दिसून आले. 

 

सध्या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी सर्व  सार्वजनिक गर्दीचे ठिकाणे बंद करण्यात आले असून, केवळ काही अति महत्त्वाचे ठिकाण सुरू असून त्यामध्ये बँकेचा समावेश आहे. मात्र बँकेसमोर गर्दी न करता सोशल डिस्टन्स एक मीटरच्या अंतरावर ग्राहकाने थांबावयाचे आहे. असे बंधन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. परंतु नर्सी येथील महाराष्ट्र ग्रामीण बँकेसमोर जनधन खात्यावरील पाचशे रुपये काढण्यासाठी बँकेसमोर ग्राहकांची मोठी गर्दी दिसून आली. याठिकाणी ग्राहकाकडून कोणतेही सोशल डिस्टन्स पाळलेले दिसून आले नाही. सर्व ग्राहक एकमेकाला चिटकुन रांगेत लागल्याचे दिसून आले .त्यामुळे या ठिकाणी एक पोलिस कर्मचारी नियुक्त करावा जेणेकरून ग्राहक सोशल डिस्टन्स पाळतील व त्यामुळे कोरोना  विषाणूंचा प्रादुर्भाव रोखल्या जाईल.

Popular posts from this blog

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कृषी अधिकाऱ्याच्या दालनात आंदोलन

काकडदाभा येथे अनेकांचा आमदार बांगर यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश

ओमप्रकाश देवडा बँकेला ३.१५ कोटीचा निव्वळ नफा