अंगणवाडी केंद्र बंद असुनही बालकांचे शिक्षण सुरुच.!
अंगणवाडी केंद्र बंद असुनही बालकांचे शिक्षण सुरुच.!
व्हॉटसअप ग्रुपच्या माध्यमातून सेविका देतायेत बालकांना धडे
हिंगोली - कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे जिल्ह्य़ातील अंगणवाडी केंद्र बंद आहेत. या कालावधीत या बालकांना घरपोच आहार वाटप करण्यात येत आहे. परंतू त्यांना घरातच गुंवणून ठेवण्यासाठी कृतीशिल उपक्रमातून घरीच शिक्षण देणे सुरू झाले आहे. अंगणवाडी सेविकांना पालकाचा व्हाटअसप ग्रुप तयार करून त्या माध्यमातून शिक्षणाचे धडे दिले जात असल्याची माहिती महिला व बालकल्याण विभागाचे डेप्युटी सीईओ गणेश वाघ यांनी दिली आहे.
कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सुरू असलेल्या लॉकडाऊनमुळे अंगणवाडी केंद्र बंद आहेत. परंतू जिल्ह्यात अंगणवाडी सेविका 3 वर्षांपर्यंतच्या बालकांची आरोग्य तपासणी करत आहेत. अंगणवाडी केंद्र बंद असल्याने बालकांना आहार मिळत आहे परंतु ते घरात बसण्यासाठी कशात तरी गुंतवुन ठेवणे गरजेचे आहे, म्हणून एकात्मिक बालविकास योजनेचे आयुक्त यांच्या सुचनेनुसार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राधाबिनोद शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली कृतीशील उपक्रमातुन घरीच शिक्षण देणे सुरू केले आहे.
यामध्ये अंगणवाडी सेविका यांनी पालकांचा व्हाटसअप ग्रुप तयार करुन यावर दररोज वेगवेगळ्या शैक्षणिक कृती करण्याच्या सुचना दिल्या जातात. बालक आपल्या भोवतालच्या साहित्याचा उपयोग करुन अनुभवातून शिक्षण घेत आहेत. यामध्ये विविध रंग ओळखणे, गणणा करणे, आकार समझने, आवाज समझने, चित्र काढणे या सारख्या कृतीशील उपक्रमातुन शारिरीक, भावनीक, गणितीय शिक्षण घेत आहेत. या उपक्रमामुळे बालक दिवसभर उपक्रमात गुंतत असल्याने पालक वर्ग देखील जांम खुष झाला आहे.
कमी शैक्षणिक पात्रता असुन सुद्धा अंगणवाडी सेविका कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाचा सर्वे, बालकांची तपासणी, घरपोच आहार वाटप, जनजागृती सोबतच शैक्षणिक उपक्रम राबवत असुन अतिशय महत्वपूर्ण काम करत आहेत. त्यामुळे महिला बाल कल्याण विभागाची सर्वत्र स्तुती होत आहे. हे सर्व उपक्रम राबविण्यासाठी जिल्हा परिषदेचे सीईओ राधाबिनोद शर्मा, सामान्य प्रशासन विभागाचे डेप्युटी सीईओ धनवंतकुमार माळी ,अतिरिक्त सीईओ डॉ. मिलिंद पोहरे ,यांच्या मार्गदर्शनाखाली बालकल्याण विभागाचे डेप्युटी सीईओ गणेश वाघ यांच्यासह बाल विकास प्रकल्प अधिकारी, पर्यवेक्षिका, अंगणवाडी सेविका व मदतनीस यासाठी पुढाकार घेत असून लॉकडाऊनच्या काळात अंगणवाडीच्या बालकांना धडे देत आहेत.