परिवर्तनवादी महापुरुष राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले
हिंगोली - असेच रात्रीचे दोन वाजले होते आणि अचानक दोन मारेकरी घराचा दरवाजा ठोठावतात?आणि आणि घरामध्ये आल्यावर म्हणतात आम्ही तुम्हाला आता ठार मारणार?तुम्हाला मारण्याची आम्ही सुपारी घेतली आहे,तुम्ही लोकांनी धर्म बुडविला आहे?तेव्हा तुम्हाला जगण्याच्या अधिकार नाही असे जोर जोराने ते मारेकरी बोलत होते. तेव्हा माझा गुन्हा तरी काय आहे? मला मारून तुम्हाला काय मिळणार?तुमच्या मुलाला पुढील शिक्षणासाठी दारे बंद करायची असतील?आणि मला मारल्याने तुम्हाला आनंद होत असेल तर तर खुशाल मारा? पण मारण्याअगोदर तुम्ही माझ्याइथे आलात तर दोन घास जेवण करून मग मला मारा? असे शब्द कानी पडताच त्या दोन मारेकऱ्यांनी हात पाय जोडले व आम्हाला माफ करा, आमच्याकडून फार मोठी चूक झाली आहे. आता आम्ही तुम्हाला नाही मारणार, पण ज्यांनी तुम्हाला मारण्यासाठी आम्हाला सुपारी दिली त्यांना नक्कीच मारणार? तेव्हा थांबा अस करू नका त्यांनी तुम्हाला सुपारी दिली तो त्यांचा धर्म पण तुम्ही उलट त्यांना मारणे हा तुमचा धर्म होऊ शकत नाही. असे परिवर्तनवादी विचार सांगणारे आणि शिक्षनाची खरी व्याख्या सांगणारे खर आणि खोट यातील फरक ओळखण्याची बुद्धी म्हणजे शिक्षण होय. आणि ज्यांचे विचार खरे आणि स्पष्ट आहेत असे व्यक्ती म्हणजे आधुनिक भारताचे ज्ञानाचे विद्यापीठ महात्मा ज्योतिबा फुले यांचा जन्म 11 एप्रिल 1827 रोजी पुणे येथे झाला.
सर्व प्रकारच्या अंधश्रद्धा बाजूला सारून एक परिवर्तनवादी क्रांती घडवून आणली,18 व्या शतकात एकीकडे इंग्रजी जुलमी राजवट तर दुसरीकडे धर्मांध शक्ती यांची अन्याय अत्याचार करणारी प्रवृत्ती. अशा दोन्ही संकटाचा सामना करून आपले परिवर्तनवादी विचार पेरण्याचे काम महात्मा फुले यांनी केले. आणि हे कार्य स्वतःच्या घरापासून आपल्या पत्नीला सावित्रीबाई ला शिकवून केले. जगाच्या पाठीवर असा पहिला समाजसुधारक आहे की स्त्रियांना शिकण्यासाठी पहिली मुलींची शाळा काढली आणि त्या शाळेत सर्व धर्माच्या मुलींना समान शिक्षण देण्याचे महान कार्य केले.
ज्योतिबा फुले यांनी नुसते शिक्षनाचेच कार्य केले नाही तर गोर गरीब जनतेला आपल्या घरातील पाण्याचा हॊद खुला करून दिला. एवढेच नाही तर आताची जलयुक्त शिवार ह्या योजनेची ज्योतिबा फुले यांनी तेव्हा 180 वर्षांपूर्वी "पाणी आडवा पाणी जिरवा" ही योजना अवलंबविली. एवढेच नाही तर सतत तीन दिवस काट्या कुपट्यातून मार्ग काढून सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराज यांची 1869 मध्ये रायगडावर समाधी शोधून तिला पाण्याने स्वच्छ धुऊन पूजा करून जगातील पहिली शिवजयंती साजरी करणारे एकमेव समाजसुधारक म्हणजे ज्योतिबा फुले होय.
जसे परिवर्तन वादी विचार आत्मसात करणारे आणि त्याच बरोबर स्वाभिमानाणे जगणारे महात्मा फुले एक उद्योजक सुद्धा होते. त्यांच्याकडे 200 एकर शेती होती त्यापैकी 35 एकर फुलांची शेती होती. वर्षाचे उत्पन्न 12 लाख असायचे त्यापैकी 1 लाख टेक्स भरणारे ते पहिले महापुरुष होत. महात्मा फुले हे जातीअंतच्या पलीकडचे समाजसुधारक होते. मनुवादी विचार मातीत गाडण्याचे काम महात्मा फुले यांनी करून एक शिक्षणाची परिवर्तनाची बाग तयार करून फुलाप्रमाणे सुगंधी परिवर्तनवादी विचार आत्मसात केले. म्हणून ज्योतिबा फुले हे गोर गरीब बहुजन जनतेच्या मनातले खरे महात्मा, खरे राष्ट्रपिता आहेत. खऱ्या अर्थाने ज्ञानाचे शिक्षनाचे बीज रोवण्याचे काम हे महात्मा फुले यांनी केली. म्हणून शिक्षनाचे खरे प्रणेते हे महात्मा ज्योतिबा फुले आहेत.
सावित्रीबाई म्हणतात माझा ज्योती कैसा ! तुका जैसा !! म्हणून सर्वप्रथम तथागत भगवान बुद्धाची शिकवण संत तुकाराम महाराज यांनी आत्मसात केले. आणि संत तुकाराम महाराजांना छत्रपती शिवाजी महाराजांनी आपले गुरू मानले.छत्रपती शिवाजी महाराजांना महात्मा फुले यांनी गुरुस्थानी मानले. 1890 मध्ये महात्मा फुले यांचे निधन झाले तर 1891 मध्ये बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म झाला तरी बाबासाहेबानी फुलेंना विचारांचे गुरू मानले. आणि खऱ्या अर्थाने जगाच्या कानाकोपऱ्यात महात्मा फुले पोहचले याचे सर्व श्रेय हे बाबासाहेबाना जाते.बाबासाहेबाना शिक्षण घेण्यासाठी कोल्हापूरचे छत्रपती शाहू महाराज आणि बडोद्याचे सयाजीराव गायकवाड महाराज यांनी आर्थिक मदत केली. आणि जग बदल घालुनी घाव मज सांगून गेले भीमराव असे सांगणारे थोर साहित्यिक अण्णा भाऊ साठे हे सर्व महापुरुष वेगवेगळ्या जातीचे होते पण त्यांनी चुकूनही जातीव्यवस्था मानली नाही ते सर्व एका परिवर्तनवादी विचारसरणी ने बांधले गेले होते. तेव्हा आपण सुद्धा या विज्ञानाच्या युगात सर्व अंधश्रद्धा बाजूला ठेऊन या महापुरुषांच्या परिवर्तनवादी विचारांची अंमलबजावणी करूया ! तेव्हा महात्मा फुले यांच्या जयंती निमित्त विचारांची आदरांजली.व सर्व भारतीय नागरिकांना मंगलमय शुभेच्छा!
लेखक- प्रा.आशिष इंगळे,
शिवाजी महाविद्यालय,हिंगोली.