रानडुकराच्या हल्ल्यात एक जण गंभीर जखमी इसापुर रमणा येथील घटना

रानडुकराच्या हल्ल्यात एक जण गंभीर जखमी


इसापुर रमणा येथील घटना


हिंगोली -  तालुक्यातील इसापूर रमणा येथे रानडुकरांचा सुळसुळाट वाढल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे. सोमवारी रानडुकराने शेतात काम करीत असलेल्या शेतकऱ्यावर हल्ला केल्याने शेतकरी गंभीर जखमी झाला आहे. ही घटना सोमवारी सायंकाळी तीनच्या सुमारास घडली. यामुळे इसापुर परिसरातील शेतकरी वर्गात भीतीचे वातावरण पसरले आहे.


 इसापुर येथील माधव रायाजी जगताप हे आपल्या शेतात सोमवारी काम करीत असताना अचानक एका रानडुकराने हल्ला करून एका पायाच्या मांडीवर गंभीर दुखापत केली. दरम्यान,माधव जगताप यांच्यावर रानडुकराने हल्ला करताच ते जोराने ओरडले असता आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी धाव घेत त्यांना 
रानडुकराच्या तावडीतून वाचविले यावेळी विश्वनाथ चौतमल,माजी सरपंच लक्ष्मण जगताप, बालाजी हराळे यांनी सावध गिरी बाळगून माधव जगताप यांना रानडुकराच्या तावडीतून वाचविले. त्यानंतर या सर्वांनी तातडीने माधव जगताप यांना खाजगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल केले.


रानडुकराने माधव जगताप यांच्या डाव्या पायाच्या मांडीला जोरदार हल्ला चढवीत गंभीर जखमी केले यात त्यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली. असता डॉक्टरानी त्यांच्या मांडीला दहा टाके मारले असल्याचे सांगितले. ही जखम एवढी गंभीर होती की, रान डुकराने चक्क मांडीत शिंग खुपसल्याने मांडीचा मांसल भाग बाहेर पडला होता. डॉक्टरने तातडीने त्यांच्यावर उपचार केले आहे.


तालुक्यातील इसापुर रमणा सह आदी भागात गेली अनेक वर्षांपासून रान डुकराने धुमाकूळ घातला आहे. यापूर्वी देखील रानडुकराने अनेक लोकांवर हल्ले केल्याचे नागरिक सांगत आहेत. तर शेतातील उभ्या पिकांचे रान दुकराकडून मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याने परिसरातील शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान होत आहे. याकडे मात्र वन विभागाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांचे साफ दुर्लक्ष होत आहे.


इसापुर परिसरात रान डुकरांकडून नेहमीच पिकांची नासाडी करणे, यासह शेतकऱ्यांना जखमी करणे अश्या घटना अनेकवेळा या परिसरात घडल्याने नागरिक रानडुकराला वैतागले असून याचा बंदोबस्त करण्याची मागणी अनेक वेळा केली होती. मात्र वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी याकडे दुर्लक्ष केल्यामुळे आज ही घटना घडली आहे. रान डुकरांचा बंदोबस्त करावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.


Popular posts from this blog

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कृषी अधिकाऱ्याच्या दालनात आंदोलन

काकडदाभा येथे अनेकांचा आमदार बांगर यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश

ओमप्रकाश देवडा बँकेला ३.१५ कोटीचा निव्वळ नफा