कळमनुरीत ७०० कुटुंबांना घरपोच अन्नधान्य व किराणा साहित्य वाटप








 

नगरसेवक निहाल कुरैशी यांचा पुढाकार

 

कळमनुरी - देशात कोरोना व्हायरस च्या पार्शवभुमीवर गेल्या अनेक दिवसा पासुन शासना तर्फे लाऊकडाऊन करण्यात आले आहे. अश्या परिसथितीत गोर गरीब लोकांंचे व मजुरांचे जिवन आर्थिक संकटात सापडले आहे.अश्या परिस्थितीत शहरातील गरजू लोकांसाठी  नगर सेवक निहाल कुरैशी यांच्या पुढाकारातून रविवारी  सातशे कुटुंबाना  अन्न धान्य व अत्यावाश्यक साहित्य वाटप करण्यात आले.

 

 कोरोना विषानुच्या प्रसार रोखण्यासाठि गेल्या अनेक दिवसा  पासुन लॉकडाऊन  व संचारबंदी  असल्याने  हातावर पोट असणाऱ्या नागरिकांवर उपसमारीची वेळ आली आहे. संचार बंदीच्या काळात कोणीही उपाशी राहू नये यासाठी शहरातील दानशूर व्यक्ती कडून मदतीचा हात पुढे केला आहे. त्यामुळे अन्न छत्राच्या मदतीने पालवारील गरजू नागरिकांना साहित्य व जेवणाचे डबे पुरविले जात आहेत.

 

कळमनुरी शहरात ही नगरसेवक निहाल कुरैशी यांनी तब्बल ७०० कुटुंबांचा उदरनिर्वाह व्हावा म्हणून आवश्यक सामान वाटप केले. यात  गहू, तांदुळ, खाद्यतेल, साबन आदी वस्तूंचा  समावेश आहे. नगरसेवक निहाल कुरैशी यांनी गरजु लोकांना संपर्क करण्याचे आव्हान केले. हे  कार्य पालकमंत्री  वर्षाताई गायकवाड़,  खासदार राजीव सातव यांच्या आव्हानाला प्रतिसाद देऊन करण्यात येत असल्याचे नगर सेवक निहाल कुरैशी यांनी सांगीतले.


 

 



 



 















ReplyForward







Popular posts from this blog

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कृषी अधिकाऱ्याच्या दालनात आंदोलन

काकडदाभा येथे अनेकांचा आमदार बांगर यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश

ओमप्रकाश देवडा बँकेला ३.१५ कोटीचा निव्वळ नफा