तोष्णीवाल महाविद्यालया तर्फे विद्यार्थ्यांना ऑनलाइन मार्गदर्शन
तोष्णीवाल महाविद्यालया तर्फे विद्यार्थ्यांना ऑनलाइन मार्गदर्शन
आतापर्यन्त आठ हजार विद्यार्थ्यांचा सहभाग
हिंगोली - सध्या जगभरात कोरोना महामारीच्या संकटाने थैमान घातले असून ,भारतात पूर्णतः लॉकडाऊन करण्यात आले आहे. याचा फटका शिक्षण क्षेत्राला देखील बसला आहे. बहुतांश ठिकाणी शिक्षणाचे आदान-प्रदान पूर्णतः बंद आहे.याचे भान ठेवत श्री गजानन शिक्षण प्रसारक मंडळाने संस्थापक अध्यक्ष श्री. बी.आर.तोष्णीवाल यांनी आपल्या संस्थेअंतर्गत येणाऱ्या सर्व शैक्षणिक संकुलांना ऑनलाइन मार्गदर्शन करण्याच्या सूचना केल्या आहेत.त्यानुसार तोष्णीवाल महाविद्यालयाने विद्यार्थ्यांचे हित जोपासत ऑनलाईन धडे दिले जात आहेत.
विद्यार्थी हेच दैवत ठेवून तोष्णीवाल महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक गूगल क्लासरूम, व्हिडिओ प्रेझेंटेशन,लाइव डिस्कशन हे सर्व व्हाट्सअप यूट्यूब,फेसबुक,झूमअॅप अशा नवीन इलेक्ट्रॉनिक्स माध्यमाचा उपयोग करत आहेत. आत्तापर्यंत झूम ॲपच्या माध्यमातून डॉ.पजई यांनी ६० विद्यार्थ्यांशी संत साहित्य या विषयावर मार्गदर्शन केले. विवाह संस्था या विषयावर डॉ.राजाभाऊ नवगनकर,घसारा या विषयावर डॉ. प्रवीण तोतला, ग्रामीण मराठी साहित्य या विषयावर प्रा.संजय फड यांनी संवाद साधला.यूट्यूबच्या माध्यमातून डॉ.भगवान घुटे, डॉ.दत्ता सावंत, प्रा.धनाजी पाटील यांनी संवाद साधला. प्रा.तडस यांनी ऑनलाईन परीक्षापद्धती,डॉ.संजय अग्रवाल यांनी उद्योजकता विकास या विषयावर तर डॉ.विकास शिंदे, यांनी कोरोनावर ऑनलाइन परीक्षा घेतली.
ऑनलाइन कोविड मध्ये आतापर्यंत ७९५३ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. बेसिक इलेक्ट्रॉनिक्स सर्किट या विषयावर डॉ.निखिलेश बजाज व डॉ.जोशी यांनी ऑनलाईन सर्टिफिकेशन कोर्स घेतला. ज्यामध्ये १०५ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. झूम ॲप द्वारे राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. यु.पी.सुपारे यांनी सुद्धा मार्गदर्शन केले.ई-वर्तमानपत्र यांच्या माध्यमातून प्रा.त्र्यंबक केंद्रे यांनी समाजातील सर्व घटकांशी संपर्क साधला.तरी महाविद्यालयाच्या इतर सर्व विद्यार्थ्यांनी ऑनलाईन मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन संस्थाध्यक्ष श्री. बी.आर. तोष्णीवाल,महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष रमण तोष्णीवाल,सचिव यु.एम.शेळके, प्राचार्य एस. जी.तळणीकर यांनी केले आहे.